
आयुषी प्रजापती (८) रा. सहेरीखास, भवानीगंज, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, असे मुलीचे नाव आहे. नातेवाईक तिला उपचारासाठी मुंबईला घेऊन जात होते. गो-एअरच्या लखनऊ -मुंबई विमानातून त्यांचा प्रवास सुरू होता.
नागपूर : आकाशात असलेल्या विमानातील ८ वर्षीय मुलीची प्रकृती अचानक खालावली. विमानाच्या इमर्जंसी लँडिंग करून तिला वाचविण्याचे सर्वच प्रयत्न करण्यात आले. शर्थीच्या प्रयत्नांनंतरही मुलीचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे घडलेली ही घटना बचावाचे प्रयत्न करणाऱ्या मंडळींच्या जिवाला चटका लावणारी ठरली.
हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली
आयुषी प्रजापती (८) रा. सहेरीखास, भवानीगंज, सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, असे मुलीचे नाव आहे. नातेवाईक तिला उपचारासाठी मुंबईला घेऊन जात होते. गो-एअरच्या लखनऊ -मुंबई विमानातून त्यांचा प्रवास सुरू होता. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास तिची प्रकृती अधिकच खालावली. नातेवाइकांनी विमानातील क्रुमेंबर्सना माहिती दिली. त्यावेळी नागपूर विमानतळाजवळ असल्याने वैमानिकाने विमान उतरविण्याचा निर्णय घेतला. नागपूर विमानतळाशी संपर्क साधून घटनेची माहिती देत इमर्जंन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विमानतळानेही विमान उतरविण्याची परवानगी दिली. विमानाचे लँडींग होताच रुग्णावाहिकेतून तातडीने मुलीला प्रथम खासगी व तिथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु, तोवर बराच उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नागपूर विमानतळावर थांबलेले विमान सुमारे तासाभराच्या प्रतिक्षेनंतर मुंबईकडे रवाना झाले.