गंमत करण्याच्या हेतूने लावली बाथरूमच्या दाराची कुंडी अन् झाले देव'दर्शन'

अनिल कांबळे
Friday, 28 August 2020

जखमी फिर्यादी अक्षय मेंढे याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे. मात्र, गुरुवारी जखमी शुभमचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी, हुडकेश्वर पोलिसांनी घटनेसह आरोपींची माहिती वर्धा पोलिसांना दिली.

नागपूर : क्षुल्लक कारणावरून मित्रांनी युवकावर धारदार शस्त्राने वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. गंभीर जखमी अवस्थेत युवकाला रुग्णालयात नेले असता गुरुवारी डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही थरारक घटना हुडकेश्वर हद्दीतील दिघोरी टोल नाक्याजवळ सोमवारी रात्री घडली. सर्व आरोपी घटनेनंतर वर्धा येथे पसार झाले होते.

शुभम गणवीर (२२, रा. वर्धा) असे खून झालेल्या युवकाचे नावे आहे. दर्शन हरिभाऊ फुंडे (रा. गणेशनगर, वर्धा), कोहिनूर संजय उके (रा. इंदिरानगर, वर्धा), विशाल नारायण मोहुर्ले (रा. सालोड, हिरापूर), अनिकेत ऊर्फ अनूप ढाले (रा. समतानगर, वर्धा) अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, आरोपी आणि शुभम गणवीर हे वर्धा शहरातील रहिवासी आहेत. सर्व जण कामानिमित्त दिघोरी टोल नाक्याजवळील सृष्टी एनक्लेव्ह अपार्टमेंटमधील बी. विंग, रूम नंबर ००१ येथे फ्लॅटमध्ये राहायचे.

जाणून घ्या - रोजगार मिळावा म्हणून विकली वडिलोपार्जित शेती.. पण पैसे देताच बाहेर आले धक्कादायक सत्य; नक्की काय घडले

काही दिवसांपूर्वी आरोपी दर्शन हा बाथरूममध्ये गेला असताना गंमत करण्याच्या हेतूने शुभमने दाराची कुंडी लावली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान आरोपी दर्शन हा इतर साथीदारांसोबत खोलीवर आला. आरोपींनी पुन्हा भांडण करून शुभमवर हल्ला चढविला. शुभमच्या पोटावर, छातीवर चाकूने वार करून त्यास रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.

जखमी फिर्यादी अक्षय मेंढे याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे. मात्र, गुरुवारी जखमी शुभमचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी, हुडकेश्वर पोलिसांनी घटनेसह आरोपींची माहिती वर्धा पोलिसांना दिली. वर्धा पोलिसांनी माहिती मिळताच सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा - राणे फॅमिली सुसाईड मिस्ट्री: अजून एक ट्टिस्ट; मृत धीरजची आई अचानक प्रगटली .. केले हे गंभीर आरोप

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four friends killed a friend in Nagpur