मोठी बातमी : या जिल्ह्यात रोज होतो कोरोनाने एकाच मृत्यू, मृतांची संख्या पोहोचली...

केवल जीवनतारे 
Tuesday, 14 July 2020

शहरातून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत 1550 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या सुमारे 800 रुग्णांवर मेयो,मेडिकल आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय कोविड सेंटरमध्येही 300वर लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले आहे.

नागपूर  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव उपराजधानीत वाढत आहे. त्याच गतीने आता मृत्यूचा टक्का देखील वाढू लागला. दर दिवसाल कोरोनाबाधिताचे होणारे मृत्यू प्रशासनासाठी चिंताजनक बनले आहेत. सोमवारी दोन मृत्यू झाल्यानंतर लगेच मंगळवारी (ता. 14) एका 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. कोरोना बाधितांचा आकडा देखील 2 हजार 360 वर पोहोचला आहे. शहरात 38 व्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

मनीषनगर येथील रहिवासी असून त्याला रक्तदाब, मधुमेह हे आजार होते. परंतु कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. कोरोनाची बाधा झाल्यानंतर वृद्ध व्यक्तीला श्‍वसनाचा गंभीर त्रास झाला. त्यांना हाय फ्लो नेझल ऑक्‍सिजनचा पुरवठा केला.परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.

जाणून घ्या - मुलांच्या हट्टापोटी वडिलांनी घेतला स्मार्टफोन, बहीण-भाऊ दोघेही खूश; मात्र, आईने मध्यस्ती केल्याने मुलीची आत्महत्या

शहरातून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आतापर्यंत 1550 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्या सुमारे 800 रुग्णांवर मेयो,मेडिकल आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय कोविड सेंटरमध्येही 300वर लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना दाखल करण्यात आले आहे.

असे आहेत कोरोनाचे मृत्यू ...

"एप्रिल' महिन्यातील मृत्यू

 • 5 एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 29 एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

"मे'मधील मृत्यू

 • 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
 • 11 मे रोजी पांढराबोडी येथील 29 वर्षीय युवकाचा मृत्यू
 • 16 मे रोजी गड्डीगोदाम येथील 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
 • 17 मे रोजी शांतीनगर येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 18 मे रोजी मोमिनपुरा येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
 • 25 मे रोजी मोमिनपुरा येथील 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 27 मे रोजी सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू
 • 30 मे रोजी रस्त्यावरचा भिक्षेकऱ्याचा मृत्यू
 • 31 मे रोजी हिंगणा रोडवरील 73 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

बापरे! - पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडणे पडले त्याला महाग... वाचा मग काय झाले

"जून'मधील मृत्यू

 • 4 जून रोजी अमरावती येथील 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 4 जून रोजी मध्य प्रदेशातील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू
 • 7 जून रोजी अमरावती येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू
 • 8 जून रोजी हंसापुरी येथील 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 12 जून रोजी अकोला येथील 56 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू
 • 15 जून रोजी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 50 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू
 • 17 जून रोजी कन्हान येथे घरी विलगीकरणातील 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 21 जून रोजी जबलपूर येथील 40 वर्षीय व्यक्‍तीचा मृत्यू
 • 22 जून रोजी अमरावतीच्या मोमीनपुरा येथील 36 वर्षीय पुरुषाचा मृत्यू
 • 22 जून रोजी अमरावती जिल्ह्यातील 75 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू
 • 26 जून रोजी मोमीनपुरा येथील 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
 • 26 जून रोजी गोंदियातील 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 28 जून रोजी राजस्थान येथील 24 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यूनंतर कोरोनाची बाधा झाल्याचे उघड
 • 29 जून रोजी मानकापुर येथील 54 वर्षीय महिलेचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला

हेही वाचा - पावसाबाबत प्रादेशिक हवामान विभागाने दिला इशारा, वाचा काय होणार...

"जुलै' महिन्यातील मृत्यू

 • 5 जुलै रोजी तेलंगखेडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 7 जुलै रोजी भांडेवाडी येथील 45 वर्षीय तरुणाचा मृत्यू
 • 8 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 8 जुलै रोजी अमरावती येथील 71 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 8 जुलै रोजी धरमपेठ टांगा स्टॅड येथील 73 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 9 जुलै रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 9 जुलै रोजी अमरावती येथील 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 10 जुलै रोजी हंसापुरी येथील 62 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू
 • 10 जुलै रोजी मनिषनगरी रेणूका येथील 49 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 12 जुलै रोजी नाईकवाडी गुप्ता चौकातील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 12 जुलै रोजी अमरावती येथील 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 13 जुलै रोजी रामेश्‍वरी येथील 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 13 जुलै रोजी भंडारा येथील 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
 • 14 जुलै रोजी भंडारा येथील 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen deaths in fourteen days, Today one death