शौक बडी चीज है! विमानप्रवासाची हौस भागवण्यासाठी मोबाईलची चोरी

योगेश बरवड
Sunday, 15 November 2020

मोबाईल गोकुळपेठ मार्केटमधून चोरल्याची त्यांनी कबुली दिली. आणखी दहा मोबाईल चोरून स्वेटर मार्केट येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींकडून सव्वा लाख रुपये किमतीचे एकूण १४ मोबाईल जप्त केले.

नागपूर : अंबाझरी पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे १४ मोबाईल हस्तगत केले आहेत. मोहम्मद जाफर शेख ईखाहिल (वय २०, रा. मोतीझरणा, साहिबगंज, झारखंड) व विक्की संजय माहतो (वय १९, रा. तीनपहाड, साहिबगंज, झारखंड) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबरला दोघेही गोकुळपेठ बाजारपेठेत संशयास्पद फिरत होते. गस्तीदरम्यान अंबाझरी पोलिसांना शंका आली. चोरटे पळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चार मोबाईल आढळून आले.

मोबाईल गोकुळपेठ मार्केटमधून चोरल्याची त्यांनी कबुली दिली. आणखी दहा मोबाईल चोरून स्वेटर मार्केट येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींकडून सव्वा लाख रुपये किमतीचे एकूण १४ मोबाईल जप्त केले.

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

झारखंडमध्ये जाऊन विक्री

दोन्ही आरोपी झारखंड राज्यातील असून, ते एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्या-येण्यासाठी विमानातून प्रवास करतात. प्रामुख्याने कोलकाता विमानतळावरून ते अन्य शहरांमध्ये जातात. चोरलेले मोबाईल व अन्य साहित्याची झारखंडमध्ये जाऊन विक्री करतात. त्यातून मोठी रक्कम हाती पडते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen mobiles seized from thieves