ऑनलाईन बुक केल्यावर वाटलं होतं घरपोच मिळेल दारू, मात्र झालं उलटच

fraud man
fraud man

नागपूर : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे दारू दुकाने बंद होती. आता शिथिलता आल्यामुळे राज्यभरात ऑनलाइन दारूविक्री सुरू आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांनी आपले नेटवर्क पसरविले आहे. त्यांच्या जाळ्यात आतापर्यंत शेकडो मद्यपी अडकले आहेत. नागपुरातील दोघांना ऑनलाइन दारूखरेदी चांगलीच महागात पडली. या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना घरपोच सेवा व वस्तू हव्या असल्याने संकेतस्थळावर विविध सेवांचे भ्रमणध्वनी शोधण्यात येतात. याचाच फायदा उचलण्यासाठी ऑनलाइन चोरट्यांनी विविध सेवा देणाऱ्या प्रतिष्ठानांच्या नावाने आपले भ्रमणध्वनी क्रमांक टाकून ठेवले. त्याच्या जाहिराती फेसबुक व संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या. त्या क्रमांकावर संपर्क केल्यास ऑनलाइन चोरट्यांशी संपर्क होतो. चोरटे सेवा देण्यापूर्वी ग्राहकाला त्याची सर्व माहिती विचारतात. त्यानंतर ऑनलाइन पेमेंटसाठी लिंक पाठवतात. त्यावर माहिती भरल्यानंतर हजारो रुपये बॅंक खात्यातून लंपास करतात. 

दोन दिवसांपूर्वी नागपुरात ऑनलाइन मद्यविक्रीला सुरुवात झाली. बजाजनगर परिसरातील रहिवासी जगदीप सिंग आणि हनी खट्टर यांनी पीव्हीके वाइन्स शॉपचा संपर्क क्रमांक संकेतस्थळावर शोधला असता त्यांना 7577893961 आणि 9627983064 हे क्रमांक मिळाले. त्यांनी संपर्क केला असता दोघांनीही त्यांच्या बॅंक खात्याची माहिती घेऊन त्यांचे हजारो रुपये परस्पर लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी 1.30च्या सुमारास घडली. त्यांनी संध्याकाळी सायबर सेलमध्ये तक्रार दिली. चौकशी सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com