Gang war in Nagpur over killing of criminal
Gang war in Nagpur over killing of criminal

उपराजधानीत पेटले गॅंगवार; जीव जाण्याच्या भीतीमुळे केला कुख्यात गुंडाचा ‘गेम’; ५ आरोपींना अटक

नागपूर ः जयताळ्यातील लंडन स्ट्रीटच्या मोकळ्या मैदानावर कुख्यात नीलेश राजेश नायडूच्या हत्याकांडानंतर सोनेगावात टोळीयुद्ध पेटले. दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांतील युवक समोरासमोर आले आहे. सोनेगावात आणखी गुन्हेगारी वाढण्याचे चिन्हे आहेत. नायडू हत्याकांडात सोनेगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. 

मयूर दिलीप शेरेकर (३२) स्वावलंबीनगर, सागर विक्रमसिंह बग्गा (२४) भामटी जुनी वस्ती, गोविंद भागवत डोंगरे (३२) भामटी, विशाल नामदेव गोंडाणे (३३) सारनाथ बुद्ध विहाराजवळ आणि आशिष सदाशिव बंदेकर (२८) दुपारे ले आऊट, भामटी अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्‍यांची नावे आहेत. नीलेश नायडू हा कुख्यात गुंड असून तीन दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामीनावर सुटून बाहेर आला होता. 

सोमवारी दुपारी नीलेश हा या घटनेतील मुख्य सूत्रधार मयूर शेरेकर याच्या मोबाईल शॉपीमध्ये गेला. त्यावेळी मयूर हा दुकानातच होता. त्याने नीलेशला मोबाईल मागितला. त्याने नकार दिला. नीलेश हा दारू पिऊन असल्याने त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत नीलेशने मयुरला त्याचा ‘गेम’ करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मयुरच्या मनात भीती निर्माण झाली होती. आपला गेम होण्याच्या भीतीमुळे नीलेशचा गेम करण्याचा कट आरोपींनी रचला. त्याने आपल्या मित्रांना गोळा केले आणि कट सांगितला.

सायंकाळी सातच्या सुमारास नीलेश आणि त्याचा मित्र प्रतीक राहुल सहारे (२७) भीमनगर, पुलगाव (जि. वर्धा) हे लंडन स्ट्रिटच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात दारू पीत बसले होते. त्यावेळी पाचही मारेकरी तीक्ष्ण शस्त्रानिशी तेथे आले. आरोपींनी प्रतिकच्या पायावर दगडाने वार केला. त्यामुळे लंगडत लंगडत प्रतीक तेथून पळून गेला. त्यानंतर आरोपींनी नीलेशला घेरले आणि तीक्ष्ण शस्त्राने त्याच्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. सोनेगाव पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी शोधमोहिम राबवून रात्रीच पाचही मारेकऱ्‍यांना अटक केली.

पोलिस आयुक्तांनी घेतली दखल

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी सोनेगाव पोलिस ठाण्याला भेट दिली. तासभर पोलिस ठाण्यात थांबून त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली. हत्याकांडातील आरोपींबाबत माहिती घेतली. पोलिस निरीक्षक सागर यांची परिसरात पकड नसल्यामुळे गुन्हेगारांचे प्राबल्य वाढत असल्याची चर्चा आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com