दंत रुग्णालय नव्हे कचारघर, प्रशासनाचे दुर्लक्ष

garbage issue at government dental hospital in nagpur
garbage issue at government dental hospital in nagpur

नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करताना अतिविशेषोपचार दंत रुग्णालयाच्या उभारणीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना येथील दंत रुग्णालयातील जुन्या इमारतीकडे बघितल्यास दंत रुग्णालय नव्हेतर कचराघर असेच चित्र येथे दिसून येते. नुकतेच येथील एका भागातील कचरा स्वच्छ करण्यात आला. परंतु, दुसरीकडे येथील कचऱ्याचा ढिग पसरला आहे. याकडे दंत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

सध्या दंत रुग्णालयाचे प्रशासन प्रभारी अधिष्ठाताच्या भरवशावर आहे. यामुळेच येथील स्वच्छतेकडे कोणाचेही लक्ष नाही. दंत रुग्णालयाच्या मधोमध हा कचरा टाकण्यात आला आहे. मात्र, हा कचरा उचलण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याची चर्चा दंत रुग्णालयात रंगली आहे. दंत रुग्णालयात अद्यावत असे कॅडकॅम यंत्र आहे. अ‍ॅनेस्थेशिया वर्क स्टेशन, रिसर्च सेल स्थापन केले गेले आहेत. दंतच्या अतिविशेषोपचार श्रेणीवर्धन होत आहे. सध्या या बांधकामला थांबा लागला आहे. मात्र, लवकरच सुरू होईल. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सिंधू गणविर यांच्या निवृत्तीनंतर नवीन प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडणाईक यांच्यावर येथील विकास कामाला गती देण्याचे आव्हान आहे. दंत रुग्णालयातील काही प्राध्यापक, निवासी डॉक्टर, आंतरवासिता यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी दंत रुग्णालयात असा कचरा टाकण्यावर आक्षेप नोंदविला आहे. ही जबाबदारी ज्यांची आहे, त्यांनी ती स्वीकारावी असेही संवादातून पुढे आले. हा कचरा त्वरित हटवण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com