अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...

सोमवार, 29 जून 2020

गिरीशने अभिषेकच्या बहिणीवरून अपशब्द बोलले. 'तेरे बहन को घर से उठा ले जाऊंगा...' अशी धमकी दिली. त्यामुळे अभिषेकचा पारा चढला. अभिषेकने चाकूने गिरीशवर हल्ला करीत जखमी केले. 'अगर मैं जिंदा बच गया तो तेरा गेम कर दूंगा' अशी धमकी गिरीशने दिली. त्यामुळे नीलेश, अभिषेक आणि त्यांच्या साथीदारांनी गिरीशच्या जागीच खात्मा केला. दोन तासांतच अभिषेकने मामाला फोन केला आणि हत्याकांडाची माहिती दिली.

नागपूर : इमामवाड्यातील जाततरोडीत रविवारी दुपारी झालेल्या गिरीश वासनिक हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिषेक बोरकर याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच दुसरा आरोपी कुख्यात नीलेश अंबाडरेचा शोध पोलिस घेत आहेत. गिरीशचा खून कट रचून करण्यात आला असून, हत्याकांडात 6 ते 7 अन्य आरोपींचा समावेश असल्याचा आरोप गिरीशच्या नातेवाइकांनी केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश वासनिक हा रविवारी दुपारी नुकताच जेलमधून सुटून आलेला कुख्यात गुन्हेगार नीलेश अंबाडरे आणि आतिश भोयर यांच्यासोबत दारू ढोसत होता. यादरम्यान अभिषेक बोरकरही तेथे पोहोचला. माहितीनुसार, एकेकाळी गिरीशच्या टोळीचा सदस्य असलेला अभिषेक हा गेल्या दीड वर्षापासून सचिन वासनिकच्या गॅंगमध्ये काम करीत होता. याच कारणातून गिरीशने अभिषेकला शिवीगाळ केली. गिरीशने अभिषेकच्या बहिणीवरून अपशब्द बोलले. 'तेरे बहन को घर से उठा ले जाऊंगा...' अशी धमकी दिली.

त्यामुळे अभिषेकचा पारा चढला. अभिषेकने चाकूने गिरीशवर हल्ला करीत जखमी केले. 'अगर मैं जिंदा बच गया तो तेरा गेम कर दूंगा' अशी धमकी गिरीशने दिली. त्यामुळे नीलेश, अभिषेक आणि त्यांच्या साथीदारांनी गिरीशच्या जागीच खात्मा केला. दोन तासांतच अभिषेकने मामाला फोन केला आणि हत्याकांडाची माहिती दिली. मामाने त्याला इमामवाडा पोलिसांकडे सरेंडर करण्यास सांगितले. तर नीलेश अंबाडरे फरार झाला. 

नीलेशचा होऊ शकतो गेम! 
गिरीश हा एका टोळीचा प्रमुख होता. त्यामुळे गिरीशच्या टोळीतील सदस्यांनी नीलेश अंबाडरेचा शोध घेणे सुरू केले. नीलेश पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी गिरीशच्या टोळीच्या हाती लागला तर त्याचा कोणत्याही स्थितीत गेम होऊ शकतो. त्यामुळे पोलिस नीलेशचा युद्धस्तरावर शोध घेत आहेत. अन्यथा आणखी एका गुन्हेगाराचा खात्मा होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

हेही वाचा : महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षड्‌यंत्र : कोण म्हणाले असे...

गॅंगवारमधून गिरीशचा खून 
गिरीशची टोळी सध्या "पॉवर'मध्ये होती. त्यामुळे कटकारस्थान रचून गिरीशचा गेम केल्याचा आरोप नातेवाइकांनी लावला आहे. गिरीशच्या हत्याकांडात सचिन, कुंदन, सूरज, एकांश, अरविंद, स्वप्निल, नीलेश यांचा हात असल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. जेलमधून सुटताच गिरीश गुन्हेगारीत सक्रिय झाला होता. सचिनच्या गॅंगला तो खटकत होता. नीलेश आणि अभिषेक हे दोघेही नातेवाईक असून सचिन वासनिकचे मित्र आहेत. मात्र, इमामवाडा पोलिसांनी नातेवाइकांचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे.