"कोरोना' बचावासाठी गो कोरोना फोर लेअर मास्क आणि गो कोरोना सॅनिटायझर

mask & sanitize
mask & sanitize

नागपूर : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याचा बचाव करण्यासाठी प्रशासन पातळीवर शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. नागरिकांकडून "सॅनेटायझर' आणि "मास्क'चा उपयोग वाढत असून मास्क आणि सॅनेटायझर मिळेनासे झाले आहे. मात्र, याचा फायदा घेत, "डुप्लीकेट मास्क'ची विक्री बाजारात वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या नदीम खान या विद्यार्थ्याने कोरोना बचावासाठी "गो कोरोना मास्क' आणि "गो कोरोना सॅनेटायझर' तयार केले आहे.

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. शिवाय आरोग्य विभागाकडून मास्क आणि सॅनेटायझरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठीच नदीम खान या विद्यार्थ्याने कोरोना बचावासाठी "गो कोरोना फोर लेअर मास्क' आणि "गो कोरोना सॅनेटायझर' तयार केला आहे. बाजारात साधारणत: सर्जीकल मास्क आणि "एन-95 मास्क'ची विक्री करण्यात येत आहे. सर्जिकल मास्कमध्ये तोंड आणि नाक विशेष कव्हर होत नसल्याने विषाणू तोंडात जाण्याची शक्‍यता असते. शिवाय "एन-95 मास्क' हे 3 ते 8 तासच कामाचे असतात. यातूनच नदीमला "फोर लेअर मास्क' तयार करण्याची कल्पना सुचली. यावर पंधरा दिवस संशोधन करुन त्याने डब्लुएचओ तंत्रज्ञानानुसार "नॉन ऑईल रेजीटेन्स कपड्याच्या वापर केला आहे. तर दुसऱ्या लेअरमध्ये मेटल ऑक्‍साईड तंत्रज्ञान, तिसरी लेअर "साल्ट लेअर' तर चौथ्या लेअरद्वारे गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थता कमी करता येणार आहे. बाजारात सध्या "एन-95' हे मास्क किमान पाचशे रुपयात विकण्यात येत असून 3 ते 8 तासच उपयोगी पडतात. मात्र, "गो कोरोना मास्क' केवळ 100 रुपयात सात दिवस वापरता येणे शक्‍य आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून मान्यता मिळाली असून कंपनीसोबत टायअप केले आहे. सोमवारपासून ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी ती निघाली आहे मोटरसायकलवरून जगभ्रमंतीला
आयुर्वेदिक औषधांपासून सॅनेटायझरी निर्मिती
सध्या बाजारात असलेल्या सॅनेटायझरमुळे हात जळतात आणि ड्राय होतात. रसायन खरेदी करण्यासाठी मान्यता आवश्‍यक असल्याने त्याबद्दलचा कच्चा माल मार्केटमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे नदीमने आयुर्वेदिक औषधे आणि ग्लिसरीनचा वापर करुन सॅनेटायझर तयार केले आहे. "ग्लिसरीन'मुळे त्वचेवरील ओलावा कायम राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com