बाप रे बाप... चंद्रपूर जिल्ह्यात पावणेदोनशे वाघ

राजेश रामपूरकर
Sunday, 9 August 2020

देशात २०१४ साली झालेल्या व्याघ्रगणनेत राज्यात १९० वाघ होते ते आता ३१२ वर गेले आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. ताडोबा-अंधारी, बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि सह्याद्री या सहा व्याघ्रप्रकल्पांत १८८ वाघ आढळून आले. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. यामुळेच या परिसरात गेल्या चार वर्षांपूर्वीपेक्षा वाघांची संख्या वाढली आहे. 

नागपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी व्याघ्रदिनानिमित्त २०१८ साली झालेल्या व्याघ्रगणनेनुसार वाघांची आकडेवारी जाहीर केली होती. त्यात देशात २९६७ वाघ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ असल्याचे घोषित केले होते. राज्यातील व्याघ्रप्रकल्प, अभयारण्ये आणि संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांची तपशीलवार माहिती तब्बल एका वर्षानंतर पुढे आली आहे. त्यात राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांत १८८, तर चार विभागातील संरक्षित क्षेत्राबाहेर १०७ वाघ असल्याची उघड झाले आहे. 

महाराष्ट्रातील वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात २०१४ साली झालेल्या व्याघ्रगणनेत राज्यात १९० वाघ होते ते आता ३१२ वर गेले आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे. ताडोबा-अंधारी, बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि सह्याद्री या सहा व्याघ्रप्रकल्पांत १८८ वाघ आढळून आले. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. यामुळेच या परिसरात गेल्या चार वर्षांपूर्वीपेक्षा वाघांची संख्या वाढली आहे. 

मुख्यमंत्री पुत्र तेजस ठाकरे करणार संशोधन.. कशाचे वाचा…. -

विशेष म्हणजे, संरक्षित क्षेत्राबाहेर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, मध्य चांदा या विभागात ९३ वाघ तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ८२ वाघ आढळले. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १७५ वाघ असल्याची समोर आले आहे. पैनगंगा, टिपेश्वर, उमरेड-पवनी-कऱ्हांडला या तीन १७ वाघ आढळले. वन्यजीव विभागात २०५ वाघ आहेत. ३१२ वाघांपैकी २९८ वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये आले असून १४ वाघ अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या वेळेस यवतमाळ, जळगाव, सावंतवाडी या संरक्षित क्षेत्राबाहेर आढळून आलेत. यावरून प्रादेशिक क्षेत्रातील वन कर्मचारी व अधिकारी वन्यजीव व वनसंवर्धन उत्तमरीत्या करीत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. 

संवर्धनाला प्राधान्य 

स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभाग व्याघ्रसंवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश आहे.  
संजय राठोड, वनमंत्री 

व्याघ्रप्रकल्प    वाघांची संख्या 
मेळघाट   ४६ 
पेंच   ४८ 
नवेगाव- नागझिरा    ०६ 
ताडोबा-अंधारी  ८२ 
बोर  ०६ 
अभयारण्य  वाघांची संख्या 
पैनगंगा   ०१ 
टिपेश्वर  ०५ 
उमरेड कऱ्हाडला  ११
संरक्षित क्षेत्राबाहेर  वाघांची संख्या 
ब्रम्हपूरी डिव्हिजन   ३९ 
चंद्रपूर डिव्हिजन  ३१
मध्य चांदा डिव्हिजन २३ 
इतर क्षेत्र  नागपूर, जळगाव, सावंतवाडी १४ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News : 175 Tigers in Chandrapur District