अरे व्वा... नागपूरला पहिला मान; बारा हजार अश्वशक्तीच्या इंजिनद्वारे धावली मालगाडी 

Goods train Runs With 12 Thousand Horsepower Engine
Goods train Runs With 12 Thousand Horsepower Engine

नागपूर : भारतीय रेल्वेने फ्रांसच्या सहकार्यातून मेक इन इंडिया अंतर्गत तब्बल बारा हजार अश्वशक्तीचे इंजिन तयार केले आहे. या महाशक्तिशाली इंजिनसह नुकतीच नागपूर ते आमला दरम्यान पहिली मालगाडी बुधवारी प्रयोगिकतत्वावर चालविण्यात आली. या इंजिनच्या देखभालीसाठी अजनी लोकोशेड सज्ज होत आहे. अजनीत एकूण 250 इंजिनची देखभाल केली जाणार आहे. 

बिहारमच्या माधेपुरा येथे महाइंजिनची निर्मिती करण्यात येत आहे. येवढ्या भव्य शक्‍तीच्या इंजिनची निर्मिती करणारा भारत हा सहावा देश ठरला आहे. फ्रांस तंत्रज्ञानावर आधारित एकूण 800 इंजिनची निर्मिती करण्यात येत आहे. यातील 250 रेल्वे इंजिन नागपुरात येणार असून त्याची देखभाल अजनी येथे होणार आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत इंजिन्सच्या देखभालीसाठी अजनी येथे मुख्य डेपो तयार होईल.

या डेपोमुळे नागपूर आणि लगतच्या परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. हे इंजिन सध्या ताशी 100 किमी वेगाने धावेल. मात्र, भविष्यात त्याचा वेग ताशी 120 किमीपर्यंत वाढणार आहे. यामुळे मालवाहतूक अधिक वेगवान होईल. इंजिमनध्ये जीपीएस प्रणाली असल्याने मालगाडी नेमकी कुठे आहे हे समजू शकेल. 

शक्तीशाली इंजिनच्या देखाभालीसाठी देशात अजनी आणि सारंगपूर या दोन लोकोशेडची निवड करण्यात आली आहे. नागपूरसाठी ही गौरवाची बाब आहे. या इंजिनमध्ये क्षुल्लक बिघाड असल्यास रिमोटव्दारेच अर्थात सिग्नलच्या माध्यमाने दुरुस्त करण्याची सुविधा आहे. चढाव आणि उतार भागात हे इंजिन चांगल्या पध्दतीने काम करते. ताशी 120 च्या गतीने 6 हजार टन माल वाहतूक करण्याची इंजिनची क्षमता आहे. 

25 इंजिन तयार 


पहिल्या टप्प्यात भारतात 20 ते 25 इंजिन तयार होत आहेत. त्यतील एक इंजिन 26 जुलैला आमला स्थानकावर आले. 28 जुलैला ते अजनीत दाखल झाले. 28 आणि 29 असे दोन दिवसाच्या प्रशिक्षानंतर 29 रोजी नागपूर ते आमला दरम्यान धावले. आता ते दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी बल्लारशाहला पाठविण्यात आले, पुढे भुसावळला पाठविले जाईल. प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य लोको निरीक्षक अजयकुमार सक्‍सेना यांची निवड झाली आहे. दोन दिवसात त्यांनी जवळपास 50 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यात मध्य रेल्वेचे 40 आणि उर्वरित दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com