ट्रकच्या धडकेत आजोबा-नातवाचा जागीच मृत्यू; मायलेकी गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनलाल साहू हे गुलशननगरात राहत होते. जीवनलाल यांची मुलगी लीलाबाई ही मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे राहते. सोमवारी सकाळी लीलाबाई ही मुलगा श्रेष्ठ आणि 4 वर्षीय मुलीसोबत बसने नागपूरला आली. मुलगी आणि नातवांना घेण्यासाठी जीवनलाल हे एमएच 49 ए 3692 क्रमांकाच्या मोटरसायकलने ऑटोमोटिव्ह चौकात गेले होते.

नागपूर : दोन मुलांसह माहेरी आलेली महिला वडीलांसह दुचाकीने घरी जात होती. दरम्यान दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत तिचा 6 वर्षाचा मुलगा आणि वडील यांचा जागीच मृत्यू झाला तर मायलेकी गंभीर जखमी झाल्या. हा दुर्दैवी अपघात सकाळी दहा वाजताच्या सुमारास यशोधरानगरातील शारदा कंपनीजवळ झाला. जीवनलाल साहू (वय 55) आणि नातू श्रेष्ठ पन्ना प्रजापती (वय 6) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

अवश्य वाचा - निघाला होता शाळेत; रस्त्यात ट्रकखाली सापडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनलाल साहू हे गुलशननगरात राहत होते. जीवनलाल यांची मुलगी लीलाबाई ही मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे राहते. सोमवारी सकाळी लीलाबाई ही मुलगा श्रेष्ठ आणि 4 वर्षीय मुलीसोबत बसने नागपूरला आली. मुलगी आणि नातवांना घेण्यासाठी जीवनलाल हे एमएच 49 ए 3692 क्रमांकाच्या मोटरसायकलने ऑटोमोटिव्ह चौकात गेले होते. सकाळी 8.30 च्या सुमारास लीलाबाई ही मुलांना घेऊन बसमधून ऑटोमोटिव्ह चौकात उतरली. मुलगी आणि नातवांना मोटरसायकलवर बसवून जीवनलाल हे गुलशननगरकडे जात होते. ऑटोमोटिव्ह चौकातून एकता कॉलनीकडे जात असताना मागाहून आलेल्या (एमएच 04 एसडी 2250) क्रमांकाच्या ट्रकचालकाने मोटरसायकलला मागून धडक दिली. त्यामुळे जीवनलाल आणि श्रेष्ठ हे ट्रकच्या मागील चाकात सापडून जागीच ठार झाले. लीलाबाई आणि तिची मुलगी दुसऱ्या बाजूने पडल्याने ते थोडक्‍यात बचावले. याप्रकरणी संजय जीवनलाल शाहू (19) याच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून टक ताब्यात घेतला आहे.

ट्रक सोडून चालक फरार

एकता कॉलनी रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात मुलगा आणि वृद्ध जागीच ठार झाल्याचे तर महिला व मुलगी गंभीर जखमी झोल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने संभाव्य धोका लक्षात घेता ट्रक घटनास्थळावर सोडला आणि पळ काढला. नागरिकांनी अपघातानंतर ट्रकची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीआय दिपक साखरे यांनी नागरिकांची समजूत काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

डोळ्यासमोर गेला मुलगा व वडीलाचा जीव

लिलाबाई या तीन वर्षाच्या मुलीसह गंभीर जखमी अवस्थेत घटनास्थळावर धाय मोकलून रडत होत्या. त्यांच्या डोळ्यासमोर मुलगा श्रेष्ठचा जीव गेला. हा मोठा धक्‍का सहन करण्यापलिकडे होता. दरम्यान काही मिनीटातच वडील जीवनलाल यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे लिलाबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला. या धक्‍क्‍यामुळे ती वारंवार बेशुद्ध पडत होती. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandparents die in truck collision Mylecki seriously injured