बापरे ! आरोग्य कर्मचारीही विळख्यात, कामठीत तिघे जण "पॉझिटिव्ह'...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

नागपूरच्या मेडीकल शासकीय रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून कर्तव्यावर असलेल्या व कामठी शहरातील गांधीनगर, कसाईपुरा येथे रहात असलेला 35 वर्षीय आरोग्य कर्मचारी बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने मेडीकल हॉस्पीटलमध्ये स्वतःच्या घश्‍याचे तपासणी करून घेतली. अहवालात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले.

कामठी (जि.नागपूर) : तालुक्‍यात एकाच दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळले असून त्यात कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या गांधीनगर येथे रहात असलेला 35 वर्षीय एका आरोग्य कर्मचाऱ्यांसह शहरालाच लागून असलेल्या येरखेडा येथील19 वर्षीय तरुणी तर कवठा येथील28 वर्षीय एका युवकाला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे आज आलेल्या अहवालात स्पष्ट झाले.

आणखी वाचा : अन्‌ पोलिसांनी कानठळया बसविणा-या सायलेंससरचा काढला आवाज

29जण क्‍वारंटाईन
या वृत्ताने प्रशासनात खळबळ उडाली असून या रुग्णांच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. तिन्ही रुग्णांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता तर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील आठ सदस्यांना पाचपावली तर 21 सदस्यांना नजीकच्या वारेगाव येथील कोविद सेंटर अश्‍या29जणांना क्‍वारंटाईन करण्यात आले. रुग्ण राहात असलेला परिसराचे निर्जंतुकीकरण करून काही घरांचा परिसर सील करण्यात आला.
सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्‍यातील शहरासह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून नजर ठेवून आहेत. तरीसुद्धा तालुक्‍यातील ग्रामीण भागात या संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येत आहे. नागपूरच्या मेडीकल शासकीय रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून कर्तव्यावर असलेल्या व कामठी शहरातील गांधीनगर, कसाईपुरा येथे रहात असलेला 35 वर्षीय आरोग्य कर्मचारी बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने मेडीकल हॉस्पीटलमध्ये स्वतःच्या घश्‍याचे तपासणी करून घेतली. अहवालात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : आनंदाची बातमी ! कोरोनामुळे नागपूर जिल्हयाची ही समस्या काही प्रमाणात सुटेल

तरूणी वडीलांच्या किराणा दुकानात बसायची
शहराला लागून असलेल्या येरखेडा ग्रा.प. हद्दीत येणाऱ्या वार्ड क्र.4 रामकृष्ण ले आउट येथे राहात असलेली19 वर्षीय तरुणी ही नागपूरच्या इंदोरा चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरीता गेली असता संबंधित डॉक्‍टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोनाची तपासणी करून घेतली. या तपासणी अहवालात तरुणी कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. ही बाधित तरुणी वारीसपुरा येथील वडिलांच्या किराणा दुकानात बसून हातभार लावत असे. तेव्हा हिच्या संपर्कात आणखी किती व्यक्ती आले, याचा अंदाजही व्यक्त करता येत नाही. तर कवठा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदगढ येथील 28 वर्षीय युवकाचा अपघात झाल्याने मेडिकलमध्ये उपचार दरम्यान शस्त्रक्रिया करण्याकरिता तपासणी केली. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. हा युवक नागपूरच्या मोमीनपुरा येथील रहिवासी असून आठ दिवसांपूर्वी कवठा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदगढ येथे परिवारासह वास्तव्यास आला होता. दरम्यान बुधवारी काही कामानिमित्त भंडारा येथे गेला असता त्याचा अपघात झाल्याने नागपूरच्या मेडीकल शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करण्याकरिता तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा :  मला स्पोर्ट कोटयातून नोकरी लागली असून पुणे वारियर्स संघाकडून खेळणार आहे, तू फक्‍त....

प्रशासनाची शोधमोहिम सुरू
एक एक करता तालुक्‍यातील या तिघांचाही अहवाल आज तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्याने त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली. या रुग्णांच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. माहिती मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.शबनम खानुनी पथकासह दाखल होऊन परिसराची पाहणी केली. यातील दोघांना शासकीय मेडीकलमध्ये तर बाधीत तरुणीला नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचाराकरिता तर कवाठा येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील आठ सदस्यांना पाचपावली तर कामठी शहरातील गांधीनगर येथील 16, येरखेडा व वारीसपुरा येथील पाच सदस्यांना अश्‍या एकूण 21 सदस्यांना नजीकच्या वारेगाव येथील कोविड सेंटरमध्ये क्‍वारंटाइन करण्यात आले असून रुग्ण राहात असलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करून काही घरांचा परिसर सील करण्यात आला आहे. कामठी तालुक्‍यातील बाधीत रुग्णांचा आकडा 19 वर पोहोचला असून त्यापैकी दहा रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सामाजिक अंतराचे पालन करणे, नियमित मास्क वापरून कोणतीही वस्तू खाण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुणे तसेच प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers are also known, three people in Kamathi are 'positive' ...