esakal | मोठी बातमी : निरोगी व्यक्‍तींवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रुग्णालयात सुविधा... 
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy people will be tested for the corona vaccine

नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारपासून या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात नागपूरच्या 18 ते 55 वयोगटातील निरोगी गटातील 30 व्यक्ती तर दुसऱ्या टप्यात 60 जणांना लस टोचली जाईल.

मोठी बातमी : निरोगी व्यक्‍तींवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रुग्णालयात सुविधा... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  कोरोना विषाणूची तपासणी करणाऱ्या कीटचा सध्याचा खर्च लक्षात घेता चाचण्यांवर मर्यादा होती. परंतु, नागपूरच्या डॉ. गौतम वानखेडे यांच्या संशोधनातून माय लॅबच्या पुढाकाराने "पॅथो डिटेक्‍ट कोव्हिड-19 किट तयार झाली. या स्वस्तदरातील "किट'चा राज्यात प्रयोग सुरू झाला. त्यापाठोपाठ कोरोना प्रतिबंधासाठी न्यूझीलंडमध्ये प्राण्यांवर चाचणी झालेल्या लशीची मानवावरील चाचणी भारत बायोटेक लिमी. आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासह देशातील 12 हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारपासून या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात नागपूरच्या 18 ते 55 वयोगटातील निरोगी गटातील 30 व्यक्ती तर दुसऱ्या टप्यात 60 जणांना लस टोचली जाईल. न्यूझीलंडमध्ये प्राण्यांव ही चाचणी झाली आहे. 

हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य
 

कोरोना नियंत्रणावर अद्याप उपचारासाठी कोणतेही औषध नाही. प्रतिबंधासाठी लस किंवा प्रतिबंधित वा ठोस औषध नाही. परंतु विविध संशोधन संस्थांच्या पुढाकारातून लस तसेच औषधांवरील संशोधन सुरू आहे. काही औषधांसह लशींची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने विकसित केलेल्या कोव्हॅक्‍स ही कोरोना प्रतिबंधित लस विकसित केली आहे. त्यावर न्यूझीलंडमध्ये प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. 

चाचणीचे सकारात्मक परिणाम असल्याने देशातील नागपूरसह देशातील 12 ठिकाणी मानवी चाचणीला आयसीएमआरने परवानगी दिली आहे. त्यापैकी नागपूरच्या डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात पहिल्या टप्यात 30 तर दुसऱ्या टप्यात 60 जणांवर चाचणी होईल. लस टोचण्यासाठी निवड झालेल्या व्यक्तीला मधुमेह, कर्करोग, एचआयव्ही, मुत्रपिंड, अपघातामुळे गंभीर इजा नसावी. सोबत या व्यक्तीला धूम्रपानाचेही व्यसन नसावे, असा निकष आहे. ही लस मंगळवारपर्यंत विविध रुग्णालयांना उपलब्ध होणार असून, त्यानंतर चाचणी सुरू होणार असल्याचे डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले. 


देशातील 12 केंद्रांवर चाचणी 
नागपूरसह देशातील 12 केंद्रांवर ही मानवी चाचणी करण्यात येईल. न्यूझीलंडमध्ये प्राण्यांवर ही चाचणी यशस्वी झाली. अमेरिका, इंग्लंडमध्येही या लशींवरील मानवी चाचणी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यावर पोहचली आहे. या लसीकरणाला कायदेशीर मंजुरी दिलेल्या व्यक्तीला पहिली लस टोचल्यावर दुसरी लस 14 दिवसांनी टोचली जाईल. पहिली लस लावण्यापूर्वी रक्तासह काही आवश्‍यक चाचण्या करण्यात येतील. ज्या व्यक्तींवर ही चाचणी सुरू करण्यात येईल, त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीचे प्रमाण तपासण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्यांदा 14 आणि 28 दिवसांनी तिसऱ्या रक्ताची तपासणी करण्यात येईल. 
डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, संचालक, गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय 

go to top