(Video) उपराजधानीला वादळी तडाखा, जिल्ह्यातही नुकसान, वीज यंत्रणेला मोठा फटका 

Heavy rains lashed Nagpur, damaging power supply
Heavy rains lashed Nagpur, damaging power supply

नागपूर : दुपारी तीनपर्यंत ऊन व उकाडा जाणवल्यानंतर अचानक वातावरण बदलले आणि धोधो पावसाला सुरुवात झाली. वादळी पावसाने जवळपास अर्धा तास शहराला चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याने वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला. शिवाय वीज यंत्रणेलाही वादळाचा चांगलाच फटका बसला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वादळी पावसाने जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

जोरदार वादळी पावसामुळे दीक्षाभूमी, बजाजनगर, लक्ष्मीनगर व आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या उन्मळून पडल्या. लक्ष्मीनगरात एका झोपडीवर झाड पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने त्यात जीवित हानी झाली नाही. एका ठिकाणी कारवरही झाड आदळले. अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध झाडे आडवी झाल्याने वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची धाव घेऊन रस्ता मोकळा केला. 

झाडांच्या फांद्यांमुळे स्पार्किंग होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. लक्ष्मीनगरातील ट्रान्सफार्मरमधून लख्ख उजेड निघाला. त्याचवेळी परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला. काही वेळात विज पुरवठा सुरू झाला खरा, पण लाईट डीम असल्यामुळे अनेक विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागली. नागरिकांकडून व्हीआरसीई उपकेंद्रात वारंवार संपर्क साधण्यात आला. परंतु, कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फोनवरून संपर्क साधण्यात आला असता कामात व्यस्त असल्याचे कर्मचारी व अधिकारी सांगत होते. 
 

पारशिवनी, नरखेड, कुही तालुक्‍याला झोडपले 


दुपारच्या पावसाने पारशिवनी, नरखेड, काटोल, कुही आदी तालुक्‍यांना झोडपून काढले. अनेक घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी शेतात नुकतीच पेरणी केलेले पीक पाण्याने वाहून नेले. मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे पारशिवनी शहरातील काही घरे पडली. मात्र कोणतीही प्राणहानी झाली नाही. मंगळवारी सायंकाळी पारशिवनीसह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रभाग 5 मधील लाला समर्थ यांच्या घराची भिंत कोसळली. भिंतीचा बहुतांश भाग विठाबाई फाले यांच्या घरावर कोसळला. त्यामुळे त्यांच्या घराचे देखील नुकसान झाले. घटनेची माहिती तहसील कार्यालयास दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या घटनेत दोन शेतक-यांचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. 
 

मोसंबीची झाडे जमीनदोस्त 


नरखेड तालुक्‍यातील नारसिंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या नायगाव (ठाकरे) येथे शुक्रवारी रात्री वादळी पावसामुळे चार शेतक-यांच्या शेतातील शेकडो मोसंबीची झाडे जमीनदोस्त झाली तसेच अनेक झाडे मुळासकट उपटून निघाली. यामुळे पीडित शेतक-याचे मोठ्‌या प्रमाणात नुकसान झाले आहे 
शेतकरी रामदास निंबुरकर यांच्या शेतातील 50 ते 60,ओंकार ठाकरे, दयाराम ठाकरे व ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यासह इतर नऊ शेतक-यांच्या शेतातील मिळू एकूण 100 ते 150 झाडांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शिवाय परीसरातील काही सागाची झाडे सुध्दा जमीनदोस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com