उच्च न्यायालयाचे तीन सत्रांत होणार कामकाज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्‍यक व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. 

नागपूर : लॉकडाउन 5.0 घोषित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिथिलता मिळाली आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्येसुद्धा आता जूनपासून तीन सत्रांत सुनावणी होणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्‍यक व ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. 

हेही वाचा : बनावट विक्रीपत्र तयार करून हडपले घर 

अधिसूचनेनुसार, गर्दी टाळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या कामकाजाची तीन सत्रांत विभागणी करण्यात आली आहे. 5 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांचा द्विपीठ आणि न्यायमूर्ती रोहित देव यांचा एकल पीठ, दुपारी 2 ते 3.30 व दुपारी 3.45 ते सायंकाळी 5.15 या वेळेत न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांचा द्विपीठ आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचा एकल पीठ, 9 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि अमित बोरकर यांचा द्विपीठ आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांचा एकल पीठ, दुपारी 2 ते 3.30 व दुपारी 3.45 ते सायंकाळी 5.15 या वेळेत न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि नितीन सूर्यवंशी यांचा द्विपीठ आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचा एकल पीठ, 12 जून रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत पहिल्या सत्रात अत्यावश्‍यक प्रकरणे तर, दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात ऍडमिशन श्रेणीतील प्रकरणांवर सुनावणी होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High court work now in three session