मम्मीच्या किचनमधील पदार्थ पोहचले घरोघरी 

मनीषा मोहोड-येरखेडे
सोमवार, 29 जून 2020

भरतीया कुटुंबातील चार पिढ्या या कामात गुंतल्या असून, आजेसासु, सासु, सुन आणि नात अशा चार पिढ्यातील महिलांनी यासाठी आपला वेळ आणि कौशल्य पणाला लावले आहे. कोरोनामुळे घराघरांत पोष्टीक आणि गुणवत्तापुर्ण अन्नपदार्थाला मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उत्पादन अल्पप्रमाणात होत आहे.

नागपूर : लॉकडाऊन काळात घरी एकत्रित जमलेल्या कुटुंबातील महिलांनी एकत्रित येऊन, आपल्या घरगुती पदार्थांना नागपूरातील घराघरात पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील अनेक मोठ्या आणि सधन कुटुंबातील महिला या कामात गुंतल्या असून, परिवारात सना वाराला तयार होत असलेले नमकीन आणि गोडाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात तयार करून, विक्री करणे आरंभले आहे. 
बी. सी. भरतीया कुटुंबातील चार पिढ्या या कामात गुंतल्या असून, आजेसासु, सासु, सुन आणि नात अशा चार पिढ्यातील महिलांनी यासाठी आपला वेळ आणि कौशल्य पणाला लावले आहे. कोरोनामुळे घराघरांत पोष्टीक आणि गुणवत्तापुर्ण अन्नपदार्थाला मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत उत्पादन अल्पप्रमाणात होत आहे. याचाच विचार करून, भरतिया कुटुंबातील उषा भरतिया, शांती गिनोडीया, सविता भरतिया, रीता भरतीया आणि तानिया भरतिया या चार पिढ्यातील चार महिलांनी जुन्या पिढीतील अनुभव आणि नव्या पिढीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, नमकीनचे 25 ते 30 प्रकारच्या पदार्थांचे उत्पादन तयार करण्यास सुरूवात केली आहे. मम्मीच्या किचन मध्ये तयार होणाऱ्या या पदार्थांना खरोखरच आईच्या हातची चव असल्याने, पदार्थांचे नावही "मुमकीन' असे ठेवण्यात आले आहे. आईच्या हात तयार पदार्थंचे मार्केटींग करण्याची जबाबदारी घरातील नाती आणि सुनांनी आपल्या शिरी घेत, या पदार्थांना व्हॉट्‌सऍप आणि फेसबुक सारख्या वेबसाईडवर लॉन्च करीत, महिनाभरातच शेकडो ग्राहक मिळवून दिले आहेत. 

हेही वाचा -  चिनी वस्तू आता नकोच, तब्बल एवढ्या टक्‍के नागरिकांनी टाकला बहिष्कार

नफा नव्हे गुणवत्ता महत्वाची 
मुमकीन फ्रॉम मम्स किचन अशा पद्धतीने नाव निश्‍चीत करून, कुटुंबातील महिलांनी कामाला सुरूवात केली. यामध्ये गाठीया शेव, सेव पापडी, चिवडा, रोस्टेड चना, बेसन लाडु, कच्चा चिवडा, चकली, सॉल्टेड पफ, मसाला मेथी, कॉन्फॉल्वर चिवडा, चपटी नमकीन, साबुदाना चिवडा असे अनेक नमकीन चे प्रकार मम्मीच्या किचनमध्ये तयार होत आहेत. पदार्थ मम्मीच्या किचनमध्येच तयार होत असल्याने, यासाठी बाजारातील नव्हे तर, घरातील मसाल्यांचा वापर केला जातो. तेल ही रिफाईन्ड केलेलं वापरत असल्याने, प्रत्येक पदार्थाला घरच्यासारखी चव येते. कोरोना सारख्या महामारीच्या काळात, नफा नव्हे तर, घरोघरी जाणाऱ्या पदार्थांची गुणवत्ता महत्वाची असावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, आम्ही पदार्थ तयार करत असल्याचे, भरतिया कुटुंबातील महिलांनी सांगीतले. 

विविध भागातील महिला जुळल्या 
लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. नमकीन, शेव चिवडा, पापड, लोणची अशा अनेक पदार्थांना या दिवसात मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, दुकानेच बंद असल्याने, असे पदार्थ कुठे मिळणार याचा शोध ग्राहक घेत आहेत. नागरिकांची हीच मागणी लक्षात घेऊन, सर्वच वर्गातील महिलांनी आपल्या आवडीनुसार पदार्थ बनविण्यास सुरूवात केली आहे. यात गृहउद्योगांना मोठ्या प्रमाणात बळ मिळाले असून, यामार्फत लाखोंची उलाढाल शहरात होत आहे. महिलांनी एकमेकांचे अनुकरन करीत, पदार्थ तयार करण्यास सुरूवात केली आहे. 

महिलाही आर्थिक स्वावलंबी
लॉकडाऊन काळात लोकांना घरच्या पदार्थांची चव चाखण्यास आवडेल या विचारातून, आम्ही महिनाभरापूर्वीच मुमकीन च्या उत्पादनांना सुरूवात केली. यामध्ये नमकीन चे विविध पदार्थ मागणीनूसार तयार करून दिले जात असून, यात कुटुंबातील सुना आणि मुलींचाही सहभाग आहे. मागणीनूसार कुटुंबातील मुले घरपोच पदार्थ डिलीव्हरी करीत आहेत. आमच्यापासून प्रेरणा घेऊन, अनेक महिलांनी इतरही पदार्थ तयार करून विक्री करण्यास सुरूवात केली आहे. यामाध्यमातून, वर्षानूवर्ष घरात असलेली महिलाही आर्थिक स्वावलंबी होत असल्याचा अनुभव मिळत आहे. 
सविता भरतिया, संचालिका, मुमकिन. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home made prodcuct selling door to door