अशी कशी कमी होत नाही... मी करून दाखवतो, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

बालगुन्हेगारी, ज्येष्ठ नागरिक, सायबर क्राइम याही राज्यात मोठ्या समस्या आहेत. याचाही प्राधान्याने विचार केला जात आहे. सायबर क्राइम मेट्रो सिटीमधील सर्वाधिक मोठी समस्या आहे. ती वाढतच जाणार असल्याने मुंबईत एक भव्य तसेच अत्याधुनिक लॅब उभारण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

नागपूर : उपराजधानी क्राइम सिटी म्हणून बदनाम झाली आहे. नॅशनल क्राइम ब्युरोमध्ये नागपूर अकराव्या तर राज्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यासाठी निश्‍चितच चांगली बाब नाही. मात्र, मी तुम्हाला ग्वाही देतो, येत्या काळात शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसेल, असा विश्‍वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. 

गृहमंत्री देशमुख यांनी शुक्रवारी दै. "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नागपूरच नव्हे तर राज्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या उपाययजोनांची माहिती दिली. यापुढे गंभीर व वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कायमस्वरूपी पाळत ठेवली जाणार आहे. तो न्यायालयातून सहजासहजी सुटणार नाही याचीही तजवीज केली जाईल. कुख्यात संतोष आंबेकर कोठडीत आहे. एमपीडीए अंतर्गत 30 आणि मोक्काच्या कारवाईत 70 गुन्हेगार आत आहेत. ते कायद्याच्या पळवाटा शोधून बाहेर पडणार नाहीत याची काळजी घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. 

काय झालं असावे ? - आठवडी बाजारासाठी ते गप्पा मारत निघाले आणि थरकाप उडाला, वाचा काय झाले...

बालगुन्हेगारी, ज्येष्ठ नागरिक, सायबर क्राइम याही राज्यात मोठ्या समस्या आहेत. याचाही प्राधान्याने विचार केला जात आहे. सायबर क्राइम मेट्रो सिटीमधील सर्वाधिक मोठी समस्या आहे. ती वाढतच जाणार असल्याने मुंबईत एक भव्य तसेच अत्याधुनिक लॅब उभारण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

sandip joshi साठी इमेज परिणाम

महापौरांना धमकावण्याचा प्रयत्न

महापौर संदीप जोशी यांच्यावर केलेला गोळीबार त्यांना मारण्याऐवजी धमकावण्याचा प्रकार दिसतो. पोलिस याची बारकाईने चौकशी करीत आहेत. महापौरांनाही काही सूचना व कोणावर शंका असल्यास माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा निश्‍चित छडा लावला जाईल, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

night life साठी इमेज परिणाम

नागपूरमध्ये नाइट लाइफ नाही

मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मुंबईत देश-विदेशातून लोक येत असतात. काही हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवावे लागतात. ती मुंबईची गरजसुद्धा आहे. मात्र, नागपूरमध्ये तशी परिस्थिती नाही. तसा प्रस्तावसुद्धा नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

वाचा सविस्तर - मोबाईलवर नको त्या गोष्टी बघायचा, आईने हिसकावल्याने केले हे...

 

sharad pawar साठी इमेज परिणाम

पवारांचा विश्‍वास सार्थ ठरवणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला गृहमंत्रिपद दिले आहे. त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. राज्यातील गुन्हेगारी कमी करण्याची त्यांची सूचना आहे. त्यांचा विश्‍वास सार्थ करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. निश्‍चितच राज्यातील गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसेल, असा विश्‍वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh said crime in the city will be reduced