Video : वारिस पठाण यांना दाखवणार कायदा काय असतो, असे कोण म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

नागपूर : वारिस पठाण यांनी केलेले वक्‍तव्य अत्यंय चुकीचे आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

नागपूर : वारिस पठाण यांनी केलेले वक्‍तव्य अत्यंय चुकीचे आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कठोर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

बंगळुरू येथील गुलबर्गा येथे आयोजित सभेत एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी गरळ ओकली होती. मुस्लिम समाजाला स्वातंत्र्य दिले नाही तर ते हिसकावून घ्यावे लागेल, असे पठाण म्हणाले होते. आम्ही आमच्या माता भगिनींना पुढे करून स्वत: मात्र लपून बसल्याचा दावा काही जण करीत आहेत. प्रत्यक्षात फक्‍त सिंहीणीच रस्त्यावर उतरल्या असताना तुम्हाला घाम फुटला आहे. कल्पना करा आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो तर काय होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, पंधरा कोटी हे शंभर कोटींना भारी पडतील, असे वक्‍तव्य पठाण यांनी केले होते. यानंतर राज्यभर नाराजीचा स्वर उमटला.

क्लिक करा - विदर्भावर पुन्हा ढग दाटले... तो पुन्हा येणार... पुन्हा येणार... पुन्हा येणार... 

याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता, वारिस पठाण यांनी केलेले वक्‍तव्य अत्यंय चुकीचे असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. नवाब मलीक यांच्याबद्दल जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो मी बघितलेला नाही. त्याची माहिती घेत आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. 

भाजप मुंगेरीलालचे स्वप्न पाहतेय

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यात फार काळ विरोधी पक्षनेता म्हणून राहण्याचा योग नाही, असे भाकित करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी ते लवकरच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असे वक्‍तव केले होते. याबाबत अनिल देशमुख यांना विचारले असता, भाजप स्वप्न पाहत होते की राज्यात पुन्हा त्यांचेच सरकार येईल. मात्र, तसे झाले नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे सरकार असून, ते पाच वर्षे टिकेल यात कोणतीही शंका नाही. भाजप मुंगेरीलालचे स्वप्न पाहत आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. 

बापरे! - बायकोच्या तिसऱ्या गरोदरपणासाठी बोलवले साळीला अन्‌ केले गर्भवती, नंतर...

लवकर दिशासारखा कायदा करणार

आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. आंध्र प्रदेशचे गृहमंत्री मेकाथोटी सुचारिथा यांची भेट घेत त्यांच्याकडून दिशा कायद्याचे स्वरूप, प्रक्रिया आदींची विस्तृत माहिती घेतली आहे. भेटीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात महिला अत्याचार प्रतिबंधाच्या विविध उपाययोजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. लवकर दिशासारखा कायदा करणार असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. 

लवकरच ड्रोन खरेदी

नक्षलवादाला हरविण्यासाठी विकासकामांवर भर देणार आहोत. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीने उत्तर देतानाच विकासकामांतून ही समस्या सोडविण्यात येईल. नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी कोबिंग ऑपरेशनसाठी 500 कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. तो लवकरच अंमलात येईल असे अनिल देशमुख म्हणाले. 

बापरे! - Video : स्वप्नात आले शंकरजी... म्हणाले शेतातल्या झाडातून निघेल हे...

आम्ही शरद पवारांसोबत

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)बाबत शरद पवार यांची जी भूमिका राहील तीच आमची भूमिका राहील. कोणत्याही माणसाचे नागरिकत्व जाणार नाही हीच आमची भूमिका आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेणार असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Anil Deshmukh says We will take tough action on waris Pathan