esakal | लॉकडाउनमध्ये मद्यविक्रेत्यांची छप्परफाड कमाई; मूळ किमतीपेक्षा पाचपट अधिक शुल्काची आकारणी
sakal

बोलून बातमी शोधा

Huge amount of wine sold in 5 times of rates during lockdown

साधारणतः मार्च महिन्यात मद्यविक्री परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी लागणारा अवधी अनिश्चित असते. स्टॉक कमी पडू नये यासाठी विक्रेते अधिकचा साठा करून ठेवतात. याशिवाय त्याच दरम्यान मद्याची दरवाढही संभवते

लॉकडाउनमध्ये मद्यविक्रेत्यांची छप्परफाड कमाई; मूळ किमतीपेक्षा पाचपट अधिक शुल्काची आकारणी

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : लॉकडाउन दरम्यान देश बंदिस्त होता. बंदीचा हाच काळ मद्यविक्रेत्यांसाठी मात्र छप्परफाड कमाईचा ठरला. कोणतीही ओरड न करता शौकिनांनी अव्वाच्या सव्वा भावात मद्याची खरेदी केली. अबकारी विभागाने गैरप्रकार थांबविण्यासाठी सर्वेक्षण केले खरी. पण, ते निव्वळ खानापूर्तीच ठरले. शहरातील प्रतिष्ठित मद्यविक्रेत्यानेत नाव न छापण्याच्या अटीवर बारकाव्यांसहित संपूर्ण भानगडीची माहिती दिली. 

साधारणतः मार्च महिन्यात मद्यविक्री परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी लागणारा अवधी अनिश्चित असते. स्टॉक कमी पडू नये यासाठी विक्रेते अधिकचा साठा करून ठेवतात. याशिवाय त्याच दरम्यान मद्याची दरवाढही संभवते. यामुळे साठा अधिकच वाढविला जातो. बरेचदा सहा महिने ते वर्षभर लागेल येवढा साठा बरेच विक्रेते करून ठेवतात.

अधिक माहितीसाठी - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

यंदा मार्चच्या मध्यातच मद्यविक्री बंद करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्टॉकची नोंदणी करून ठेवली. अनेक विक्रेत्यांचे अधिकाऱ्यांशी असणारे साटेलोटे हे सर्वश्रुत आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लॉकडाउनमध्ये उपराजधानीत सर्रास मद्यविक्री झाली.

हवा तो ब्रांड अगदी घरपोच मिळत होता. पण, त्यासाठी मूळ किमतीपेक्षा पाचपट अधिक शुल्काची आकारणी केली गेली. या काळातील उत्पन्न कैक पट अधिक होते. कारवाईचा धाक असला तरी पुढचे पुढे बघू ही भूमिका विक्रेत्यांनी घेतली. 

मद्यविक्री सुरू करण्याची घोषणा होताच पुन्हा स्टॉक चेक करण्याच्या सूचना मिळाल्या. पण, उपलब्ध मनुष्यबळ आणि मद्यविक्री दुकानांची संख्या लक्षात घेता स्टॉकचे मोजमाप अशक्य होते. बऱ्याच ठिकाणी स्टॉकची तपासणी केवळ कागदावरचे रकाने भरण्यापुरतीच मर्यादित राहिली. एका दिवशी किती मद्यविक्री करता येईल याबाबत कोणतेही नियम नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावले.

मद्यविक्री सुरू होताच दिवसाकाठी अगदी पेट्याच्या पेट्या विकल्याची नोंद झाली. लॉकडाउनच्या काळातील बाटल्यांच्या विक्रीचा ताळेबंद जुळवून सारे काही नियमांच्या चौकटीत बसविण्यात आले. यात संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचीही चांदी झाल्याचा दावाही माहिती देणाऱ्या मद्यविक्रेत्याने केला. 

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

अधिकाऱ्यांनी केले काय? 

विक्रीवर निर्बंध लागताच दुकानातील साठ्याची नोंद करण्यात आली. तसेच हा साठा जशाचा तसा असून त्यात तफावत आढळल्यास मी जबाबदार असल्याचे शपथपत्र दुय्यम निरीक्षकांकडून घेण्यात आले. एरवी या काळात होणाऱ्या विक्रीपेक्षा लॉकडाउनच्या काळात जास्त विक्री झाल्याचे दर्शविण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केले काय, असा सवाल उपस्थित होत आहे. याची चौकशी झाल्यास अनेक जण गोत्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

go to top