सातपुते कुटुंबाच्या शौर्याचा इतिहास झाला शंभर वर्षांचा

kalavaibhav
kalavaibhav

नागपूर: कलाउपासक अशी विशेष ओळख असलेल्या सातपुते कुटुंबाच्या घरातील "कलावैभव' संग्रहालयाचे आकर्षण अर्थात "ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर'ला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. विठ्ठलराव सातपुते "इंडियन मेडिकल सर्व्हिस'मध्ये सुभेदार सर्जन होते. त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धात गाजविलेल्या बहादुरीबद्दल ब्रिटिश शासनाने 1919 साली त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले होते. नुकतेच या नूतनीकरणामुळे संग्रहालयाचे सौंदर्य अधिकच उजळले आहे.

कलाकार, कलासक्त व कलाप्रेमी म्हणून विदर्भात नावलौकिक असलेल्या सातपुते परिवाराच्या संग्रहालयात हे सन्मानपत्र संग्रहित आहे. संग्रहालयाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला रमेश सातपुते ते आवर्जून दाखवतात.

मूळ साताऱ्याकडचे असलेले डॉ. विठ्ठलराव सातपुते तत्कालीन "इंडियन मेडिकल सर्व्हिस'मध्ये सुभेदार सर्जन पदावर होते. "ब्रिटिश आर्मी'तर्फे 1914 ते 1918 साली त्यांनी पहिल्या जागतिक महायुद्धात बर्मा फ्रंटवर मोठी कामगिरी बजावली. त्याबद्दल ब्रिटिश शासनाने त्यांना 1991 साली "ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर' या सन्मानाने व सुवर्णपदकाने गौरविले. या सन्मानपत्रावर सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ वॉर विन्स्टट चर्चिल यांची स्वाक्षरी आहे.
पुढे डॉ. विठ्ठलराव सातपुते यांना खानदेशातील पाटणा येथे जमीन प्रदान करण्यात आली. त्यावेळी त्यांनी जमविलेल्या ब्रिटन, चीन, जपान येथील कलात्मक वस्तूंचा संग्रहदेखील सातपुतेंकडे आहे. विठ्ठलराव यांच्या पत्नी गंगुबाई सातपुते व चिरंजीव शिवाजीराव यांना कलात्मक वस्तू जोपासण्याची आवड होती. शिवाजीराव यांच्या पत्नी शकुंतलाबाई, मुलगा रमेश, कन्या भाग्यलक्ष्मी व पौणिमा हेदेखील कला क्षेत्रात कलाकार म्हणून सुपरिचित होते. त्यामुळे या वस्तूंचा गेल्या शंभर वर्षांत योग्य तो संग्रह होऊ शकला आहे.

या संग्रहालयात किल्ले रायगडावर 1980 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेट दिलेले शकुंतला बाईंनी चित्रित केलेले तैलरंगी चित्रदेखील बघता येते. शिवाय पितळी भांडी व पितळी कलात्मक वस्तू, देवतांच्या पितळी मूर्ती, समया, लांबण दिवे, विड्याच्या पानाचे उबे, पानदान, फ्लॉवर पॉट्‌स, ब्रिटिशकालीन ओपनर्स, अडकित्ते, विभिन्न आकाराचे प्रकारचे कुलूप, कलात्मक थाळ्या, पात्र, नक्षीदार टेबल्स, अरेबियन बंब, हंडा, हुक्का, घंघाळ, दिवे, फोटो फ्रेम्स, कुरुक्षेत्र रथ, दागिन्यांचा डबा, शिवाय दुर्मीळ मौल्यवान पितळी वस्तूंचे प्रत्यक्ष दर्शन घडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com