पतीला जन्मठेप तर पत्नीला सक्षम कारावास; नाली साफ करण्यावरून व्यक्तीची हत्या करणे भोवले 

husband wife got punishment over taking extreme step
husband wife got punishment over taking extreme step

वर्धा : जुन्या वाद व नाली साफ करण्याचा कारणावरून कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्या प्रकरणी रामेश्वर शामदास पंचगडे याला जन्मठेप व त्याला सहकार्य करणारी त्याची पत्नी निर्मला पंचगडे हिला तीन महिने सश्रम करावास दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अति. सत्र जिल्हा न्यायाधीश आर. एम मिश्रा यांनी शुक्रवारी दिला.

थोडक्‍यात हकिगत अशी की, आर्वी तालुक्‍यातील दत्त वॉर्ड येथील राजू पंचगडे (वय 45) यांचा व रामेश्‍वर पंचगडे तसेच निर्मला पंचगडे यांच्याशी वाद होता. या वादातून रामेश्वर पंचगडे व निर्मला पंचगड यांच्या त पुन्हा वाद उफाळून आला. या वादात पंचगडे यांना दोन अल्पवयीन मुलांनी सहकार्य केले. 

एकाने राजू पंचगडे यांच्या डोळयात तिखट टाकले व दुसऱ्याने पकडून ठेवले. दरम्यान रामेश्‍वर पंचगडे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने राजू पंचगडे यांच्या डोक्‍यावर व पाठीवर सपासप घाव घातले. यात ते गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बचावासाठी राजू यांची पत्नी व मुलगा धावला असता त्यांच्यावर रामेश्वर याने प्राणघातक हल्ला केला तर निर्मला पंचगडे हिने काठीने मारुन जखमी केले.

या प्रकरणी तपासाअंती सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने पोलिस उपनिरीक्षक नागेश सिध्दाराम मात्रे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, शासनातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासले. पैरवी अधिकारी सहायक फौजदार अजय खांडरे यांनी साक्षीदारांना हजर केले. सरकारतर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता जी. व्ही. तकवाले यांचा युक्तीवाद केला.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com