तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर मीसुद्धा "क्‍लास वन' अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी का म्हणाल्या अशा....

खात : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.
खात : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.

कोदामेंढी (जि.नागपूर)  : खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक शुक्रवारी रात्रपाळीला कर्तव्यावर असताना लोकप्रतिनिधींना दारू पिऊन आढळला. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य अधिकारी कल्पना मून यांना विचारणा केली असता, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तर मीसुद्धा "क्‍लास वन' अधिकारी आहे, असा जवाब दिला. त्यामुळे परिसरात उलटसुलट शंका उपस्थित केल्या जात आहे.

अधिक वाचा : आईबाबा, मी या दुनियेत नसलो तर...असा प्रश्‍न विचारून अभियंत्याने केले हे...

अन्‌ आरोग्य सेवक मद्यपान करून तर्रर...
वासुदेव बेहनिया असे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आरोग्यसेवकाचे नाव आहे.
कर्तव्यावर असताना आरोग्यसेवक दारू पिऊन असल्याची माहिती जि. प. सदस्य राधा अग्रवाल, योगेश देशमुख, पं. स. उपसभापती रक्षा थोटे यांना मिळाली. याबाबत शहानिशा करण्याकरिता त्यांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली असता, सर्वच अवाक झाले. आरोग्यसेवक दारू ढोसून नशेत पलंगावर तर्रर्र होते. याबाबत आरोग्यसेवकाला राधा अग्रवाल यांनी विचारणा केली असता, मी ड्यूटीवर आहे, असे सांगत क्वार्टरकडे पळ काढला. क्वार्टरमध्ये जाऊन त्याने दार बंद केले. लोकांच्या मध्यस्थीने त्याला बाहेर काढून अरोली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याची कोदामेंढी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालावरून पोलिसांनी आरोग्यसेवकांवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जिवाचं, वाचा वारांगणाची व्यथा...

आरोग्य अधिकारी जाम भडकल्या
दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधी रात्रीच्या प्रकरणाबाबत विचारणा करण्याकरिता आरोग्य केंद्रात गेले. आरोग्य अधिकारी कल्पना मून यांच्याशी चर्चा करीत असताना चांगलेच वातावरण तापले. येथील आरोग्य केंद्राबाबत अनेक समस्या मांडण्यात आल्या. मात्र, आरोग्य अधिकारी कल्पना मून या लोकप्रतिनिधींवर कडाडल्या व काही न ऐकता, उडवाउडवीचे उत्तरे देत तुम्ही जरी लोकप्रतिनिधी असले, तर मीसुद्धा "क्‍लासवन' अधिकारी आहे. तुम्हाला माझी जे तक्रार करायची ते करा, असे उर्मटपणाची वागणूक लोकप्रतिनिधीला दिली. तालुका आरोग्य अधिकारी रूपेश नारनवरे यांनादेखील मून यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्ही जरी तालुका अधिकारी असले, तर मीसुद्धा तुमच्यापेक्षा "क्‍लासवन' अधिकारी आहे. असे बोलल्याची चर्चा आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी रूपेश नारनवरे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा : सर्वसामान्य कोरोनासोबत जगण्याची कला हळूहळू अवगत करीत आहेत...वाचा हा रिपोर्ट..

पोलिसांत तक्रार दाखल केली
हो मी बोलले. बोलावेच लागेल. माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल (जि. प. सदस्य राधा अग्रवाल यांचे पती) यांनी आरोग्यसेवकांना मारहाण केली. याबाबत मी अरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
-कल्पना मून, आरोग्य अधिकारी खात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com