घरी येऊन पायेतो तर काहीच उरले नवते, उरले फक्त अंगावरचे कपडे....

कोदामेंढीः पूर ओसरल्यानंतर  प्लास्टिक (ताडपत्री) बांधून सयाबाई कुथे कुटुंबीयांसोबत राहतात.
कोदामेंढीः पूर ओसरल्यानंतर प्लास्टिक (ताडपत्री) बांधून सयाबाई कुथे कुटुंबीयांसोबत राहतात.

कोदामेंढी (जि.नागपूर): ‘पुरात घर पडले जी, शेतीचा काहीच अवजाला नाही. या भागात माणूसभर पाणी होते... कुडाच्या भिंतीवर ताडपत्री बांधून राहत असलेली सयाबाई उमाकांत कुथे सांगत होत्या. सगळीकडे पाण्याचा थैमान. घरातून काय काढावे न काय नाई, कायी सुचतच नवते. संबंधितांकडे काही दिवस काढले. घरी येऊन पायेतो तर काहीच उरले नवते. उरले ते फक्त अंगावरचे कपडे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या पुस्तिकेमध्ये पुनर्वसन म्हणून कोटगावचे नाव नमूद आहे. तिसऱ्या टप्प्यात या गावाचे पुनर्वसन करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप झाले नाही. पूर येत राहील पण त्याचा फटका कुठवर  सहन करायचा याकरीता गावाचे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पुनर्वसन केल्यास तोच एक सोयीचा मार्ग आहे. बरेचदा गावकऱ्यांनी मंत्र्यांना निवेदने देखील दिलीत, मात्र काहीच झाले नाही. येथील पुरपीडितांना तोंडाला पाने पुसण्या इतपत फक्त पाच हजाराची मदत मिळाली. मात्र कोटगावचे गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करा, अशी आर्त हाक गाववासीची आहे.

गाव कोटगाव
एकूण घरांची पडझड ८६ घरे
शेतपिकांचे नुकसान १५२.३८ हेक्टर आर क्षेत्रफळ

मानवनिर्मित पूर होता
सर्व्हे अंतर्गत शेती धरणात गेली. पण अद्याप गावाचे पुनर्वसन झाले नाही. गोसे प्रकल्पाच्या पुस्तीमध्ये पुनर्वसन म्हणून कोटगावची नोंद आहे. तिसऱ्या टप्प्यात पुनर्वसन होईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप झाले नाही. हा नैसर्गिक पूर नसून मानवनिर्मित पूर होता.
विनायक भोयर
सरपंच कोटगाव (पानमारा)

मदतीच्या प्रतीक्षेत आहोत
जे होती. पाच हजार व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. ते किती दिवस पुरणार. सध्या पुरपीडितांची विदारक परिस्थिती आहे. मदतीच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र मदत मिळाली नाही.
श्रीराम ठवकर
माजी सरपंच  

मोठा धोका निर्माण होऊ शकतो
१९९४ साली देखील पूर आला होता. त्यानंतर आता परत पूर परिस्थिती झाली. वारंवार उद्भवणाऱ्या या परिस्थितीवर तोडगा म्हणून गावाचे गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसन होणे गरजेचे आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, पण दखल घेतली नाही. येणाऱ्या काळात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
हनुमंत मडावी
माजी ग्रा. पं. सदस्य
 
संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com