बोगस बियाणे विकणाऱ्यांना इशारा, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळाल, तर याद राखा...

file
file

नागपूर (ग्रामीण)  : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरणीची वेळ जवळ येत आहे. कोरोनामुळे सामान्य जनतेसह शेतकरीसुद्धा हवालदिल झालेला असताना बिकट परिस्थितीत कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांस बोगस बियाणे विकण्याचा प्रयत्नच करू नये. यामुळे शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान तर होईलच त्याचबरोबर राज्याच्या एकूण शेतमाल उत्पादनावरसुद्धा परिणाम होईल. पर्यायाने राज्याला अन्नधान्य टंचाईला सामोरे जाण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्याकरिता शासनस्तरावरून बोगस बियाणे विक्रीविरोधात धडक व परिणामकारक मोहीमच राबविण्याची अत्यंत आवश्‍यकता असल्याचा सल्ला एमआयडीसीतील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.

धाडपथके तयार करून वचक ठेवा
कृषी विभागाकडून तालुकास्तरावर अकस्मात धाडपथके तयार करून कृषी केंद्रांवर वचक ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. या धाड पथकांमध्ये केवळ शासकीयच कर्मचारी असून चालणार नाही, त्यात विविध पक्षांचा प्रत्येकी एका कार्यकर्त्याचा सामावेश करावा लागेल. तेव्हाच प्रभावीपणे बोगस विक्री करणाऱ्या केंद्रावर अंकुश ठेवण्यात यश मिळेल, अन्यथा नाही. विदर्भातील काही जिल्ह्यांतील तालुक्‍यात टोळधाडीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान अगोदरच झालेले असताना शेतकरीहिताचे निर्णय शासनातर्फे घेणे ही काळाची गरज ठरलेली आहे. शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्याची मागणी, या पूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहेच. परंतु, अद्याप या बाबतीत जिल्हा प्रशासनातर्फे काहीच संकेत मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या बाबतीत असे उदासीन धोरण शिवसेना पक्षाकडून खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.


शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे द्या !
शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासंदर्भात कृषी विभागाला यंत्रणा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत देण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रावर पाळत ठेवण्याकरिता कार्यकर्त्यांची फळी तालुका व जिल्हास्तरावर उभी करणार आहे. शासकीय अनुदान योजनेंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणारे शेतीउपयोगी अवजारे व इतर वस्तूसुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच पोहोचते करण्याची मागणीसुद्धा सर्वपक्षीय निवेदनामार्फत करण्यात येत आहे.

आणखी वाचा : काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे

सर्वपक्षीय निवेदन
सर्वपक्षीय निवेदन हे शिवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख (रामटेक लोकसभाक्षेत्र) प्रदीप ठाकरे, कॉंग्रेस पक्षाचे देवराव कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते विनोद ठाकरे, भाजप युवामोर्चा हिंगणा विधानसभेचे युवा नेते आदर्श पटले, बहुजन समाज पक्षाचे अमोल लखोटे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय मेश्राम आदींनी दिले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com