खवय्यांसाठी महत्त्वाचे...या हॉटेल्सना लागणार लॉक

राजेश रामपूरकर
गुरुवार, 11 जून 2020

नागपूर महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकात खाद्य पदार्थाची सेवी 30 जूनपर्यंत पार्सल पद्धती सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. दरम्यान, रेस्टॉरंट आणि हॉटेल सध्यातरी सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही खवय्ये हॉटेलमध्ये येतील की नाही याबाबतही शंका आहे. या विषाणूमुळे नागरिक आरोग्याबद्दल अधिकच जागरूक झाल्याने ग्राहकांची वर्दळच मंदावणार आहे.https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/corona-positive-patient-attended-party-nagpur-305225?amp

नागपूर : झणझणीत सावजी व मसालेदार पदार्थ खाण्यासाठी कायम सज्ज असलेल्या नागपूरकरांना रेस्टॉरंटमध्ये जाऊन आवडीच्या खाद्य पदार्थांवर ताव मारण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे अनलॉकडाउनच्या काळात शहरातील काही हॉटेल्सने पार्सल सेवा सुरू केली असली तरी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या व्यवसायाला सुगीचे दिवस येण्यास अजून पाच ते सहा महिने लागणार आहे. या काळात शहरातील लहान जागेवर असलेले सावजीसह इतरही लहान मोठे 20 टक्के हॉटेल्सचे शटर डाउन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाउनमध्ये असलेले अनेक नियम शिथिल केलेले आहेत. केंद्र सरकारने अनेक ठिकाणी हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना काढल्या असून कोरोनाचे रुग्ण अधिक असलेल्या शहराबाबत स्थानिक प्रशासनच निर्णय घेत आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेने काढलेल्या परिपत्रकात खाद्य पदार्थाची सेवी 30 जूनपर्यंत पार्सल पद्धती सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. दरम्यान, रेस्टॉरंट आणि हॉटेल सध्यातरी सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही खवय्ये हॉटेलमध्ये येतील की नाही याबाबतही शंका आहे. या विषाणूमुळे नागरिक आरोग्याबद्दल अधिकच जागरूक झाल्याने ग्राहकांची वर्दळच मंदावणार आहे.

बोंबला! नागरिकांनी केली पार्टी अन् ७०० लोकांना व्हावे लागले क्वारंटाईन

पालन लहान हॉटेल कशी घेतील खबरदारी 

हॉटेल सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिल्यानंतर ग्राहक आणि कर्मचारी या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. या नियमांचे पालन करणे लहानशा जागेत बेरोजगारांनी थाटलेल्या सावजी हॉटेलसह इतरही लहान हॉटेलला शक्‍य नसल्याने पहिली गदा यांच्यावरच येणार आहे. या हॉटेलमध्ये दोन टेबलमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, 50 टक्के कर्मचारी कामावर असणे, ज्या ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहक यांच्या स्पर्धा होणार आहे. त्या सर्व जागा सतत सॅनिटाईज करणे, तसेच काम करीत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबतही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे, याचे पालन लहान हॉटेल कसे पाळतील असाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने 30 जूननंतर हॉटेल सुरू होतील याबाबत स्पष्ट केलेले आहेत. शहरात एक हजारापेक्षा अधिक लहान मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आहेत. त्यातील 10 ते 15 टक्केच व्यावसायिक पार्सलची सेवा देत आहेत. बार बंदच आहेत. या स्थितीत शहरातील 20 टक्के लहान मोठे हॉटेल्स बंद होतील अशी शक्‍यता आहे. या व्यवसायात सरासरी 10 ते 12 हजार कामगार कार्यरत असून ते सर्वच बेरोजगार झालेले आहेत. 
गणेश दवे, अध्यक्ष, नागपूर ओनर्स हॉटेल असोसिएशन 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important For Foodies...Some Hotels Will be Lock Soon