हमका पीनी है, पीनी है, हमका पीनी है...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2019 दरम्यान म्हणजे नऊ महिन्यांत नागपूर जिल्ह्यात चार कोटी 10 लाख 97 हजार 624 लिटर दारूची विक्री झाली. यात सर्वाधिक विक्री देशीची झाली. 2018 मध्ये याच काळात तीन कोटी 82 लाख 39 हजार 914 लिटर दारूची विक्री झाली होती. नऊ महिन्यांत 28 लाख 57 हजार 710 लिटर दारूचा खप जास्त झाला. 

नागपूर : जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत चार कोटी लिटर दारूची विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत 28 लाखांची वाढ झाली आहे. यातून उत्पादन शुल्क प्रशासनाला तीन कोटी 91 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. अतिरिक्त दारू सेवन आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगण्यात येत असले तरी पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 

Image result for daru

दारू पिण्याबद्दल वेगवेगळे मत प्रवाह आहेत. काहींकडून याचे समर्थन केले जाते तर काहींकडून विरोध. दारू सेवनामुळे अनेकांचा जीव गेला असून, कित्येकांचे संसारही उद्‌ध्वस्त झाले आहेत. यामुळे अनेक गावात दारू दुकानाच्या विरोधात आंदोलनही झाले. वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. नागपूर जिल्ह्यासह शहरात दारूबंदीसाठी आंदोलन झाले. दारू हानिकारक असल्याचे सांगण्यात येत असली तरी त्याचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसते.

Image result for daru

उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते डिसेंबर 2019 दरम्यान म्हणजे नऊ महिन्यांत नागपूर जिल्ह्यात चार कोटी 10 लाख 97 हजार 624 लिटर दारूची विक्री झाली. यात सर्वाधिक विक्री देशीची झाली. 2018 मध्ये याच काळात तीन कोटी 82 लाख 39 हजार 914 लिटर दारूची विक्री झाली होती.

अधिक वाचा - दारू पिऊन जुने भांडण उकरून काढले आणि...

नऊ महिन्यांत 28 लाख 57 हजार 710 लिटर दारूचा खप जास्त झाला. दारूचा खप वाढल्याने पिणाऱ्यांच्या संख्येत व प्रमाणात वाढ झाल्याचा तर्क सांगण्यात येते. यातून प्रशासनला 391 कोटींचा महसूल प्राप्त झाला. मागील वर्षी 303 कोटींचा महसूल मिळाला होता. उत्पादन शुल्क विभागाला शासनाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागातील एक आहे, हे विशेष. 

Image result for daru

अशी आहे विक्री   
प्रकार विक्री (लिटरमध्ये)
देशी 2,30,49,742
विदेशी 99,18,953
बिअर 80,06,451
वाईन 1,22,478

जिल्ह्यात 312 दुकाने

जिल्ह्यात देशी दारूचे सात उत्पादक असून, 19 होलसेल विक्रेते आहेत. देशी दारूची 312 दुकाने आहेत. विदेशी दारूच्या पाच उत्पादक कंपन्या असून, 22 होलसेल विक्रेते आहेत. 123 दुकाने आहेत. तर 813 बिअरबार व 10 क्‍लब आहेत. 

Related image

दारूप्रती उत्सुकता वाढली 
दारूकडे पाण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे. दारूप्रती उत्सुकता वाढली आहे. पिणाऱ्यांमध्ये पालकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ते मुलांनाही रोखत नाहीत. सेलिब्रेशनमध्ये दारूचे वेगळे महत्त्व आहे. हे स्टेटस सिम्बॉल झाले आहे. एन्जॉय म्हणून पिली जाणारी दारूची केव्हा सवय होते, हे समजतही नाही. याचा मानसिकतेवरही परिणाम होतो. 
- डॉ. राजा आकाश,
मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in the number of drinkers in Nagpur district