मनीषनगर आरओबीसाठी चार तास रेल्वे 'ब्लॉक ', लोखंडी गर्डर बसविण्याचे काम पूर्ण

Iron girder installation work completed on manish nagar railway line in nagpur
Iron girder installation work completed on manish nagar railway line in nagpur

नागपूर : मनीषनगर आरओबीसाठी आव्हानात्मक लोखंडी गर्डर बसविण्याचे काम चार तास रेल्वे बंद करून पूर्ण करण्यात आले. रेल्वेने केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या मनीषनगर आरओबीचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास महामेट्रोने व्यक्त केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या या कामामुळे नागरिकांना पुढील काही महिन्यांत रेल्वे लाईन ओलांडताना धोका राहणार नाही.

मनीषनगर येथे रेल्वे क्रॉसिंगचे फाटक असून दिवसातून अनेकदा रेल्वेची ये-जा सुरू असते. त्यामुळे नागरिकांना फाटकाजवळ प्रत्येक वेळी १५ मिनिटे थांबावे लागते. वेळेचा अपव्यव होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत होता. ६४.३८ मीटर लांब गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आरओबीची रुंदी १२.६ मीटरर असून दोन्ही बाजूने नागरिकांसाठी फूटपाथचीही सुविधा आहे. या लोखंडी गर्डरसाठी मार्चपासून साहित्य गोळा करण्याचे काम सुरू होते. ३६० वजनाचे हे गर्डर आरडीएसओच्या मानकानुसार तयार करण्यात आले आहे. हे गर्डर बसविण्यासाठी त्याखाली पाचशे टन लोखंडांचा आधार देण्यात आला होता. या आरओबीमुळे मनीषनगर परिसर व वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर एकमेकांना जोडला जाणार आहे. याशिवाय वर्धा मार्गावरील तीन मजली पूलाला हा आरओबी जोडण्यात येणार आहे. 

मनीषनगर आणि बेसा भागातून विमानतळ किंवा वर्धा मार्गावर नागरिकांना अल्प कालावधीत पोहोचता येणार आहे. येथे आरओबीची नागरिकांची जुनी मागणी होती. या पूलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने महामेट्रोकडे दिले होते. महामेट्रोने एकाच ठिकाणी २ वेगवेगळ्या पद्धतीचा रस्ता तयार केला आहे. जमिनी मार्गावरून ५०० मीटर लांब आरयुबी तयार केला असून ६४. ३८ मीटर लांब आरओबीचे कार्य पूर्ण केले. महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मनीष नगर आरओबीचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमित्त महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी मेट्रो कामगार तसेच अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

या पूलाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून ऑक्टोबर २०२० पासून आरओबी व आरयुबी नागरिकांसाठी खुला होईल. मनीषनगर आणि बेसा भागातून विमानतळ किंवा वर्धा मार्गावर पोहोचणे कमी वेळात शक्य होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com