communcation
communcation

कुटुंबात संवाद साधण्याची उत्तम संधी

नागपूर : एकीकडे कोरोना व्हायरसची व्याप्ती वाढत असल्याने त्यासंबंधी योग्य ती काळजी घेतली जात असता रविवारी राज्यात जनता कर्फ्यू ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. रविवारी बाहेर पडता येणार नसल्याने, कुटुंबातील सर्व सदस्य घरातच राहणार. ही कुटुंबात संवाद साधण्याची उत्तम संधी असून, याचा पुरेसा आनंद नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन करीत, मानसोपचार तज्ज्ञ राजा आकाश यांनी दिवस आनंददायी करण्यासाठी काय करता येईल याबाबत काही महत्वाच्या गोष्टी नागरिकांना सांगीतल्या आहेत.

 कुटुंबातील सदस्यांनी संवाद एकमेकांशी साधावा.

  • लहान मुलांसोबत नवनवीन खेळ खेळावेत.
  •  मुलांना सोबत घेऊन घरातील पुरुषांनी एखादा नवीन पदार्थ बनवून पहावा.
  •  सकाळी लवकर उठून, घरातील छोटी छोटी कामे विभागून घ्यावीत.
  •  मुलांसोबत घरातच बैठे खेळांसह अन्य खेळ खेळून आनंद घ्यावा.
  • कविता, पाढे, सूत्र, नियम वैगरे अभ्यासाच्या गोष्टी त्यांच्याकडून मोठ्याने म्हणून घ्या.
  •  बैठे खेळ वा इतर खेळांची मजा त्यांच्यासमवेत लुटा.
  •  गोष्टी सांगण्याचा, गोष्टी मोठ्याने वाचण्याचा प्रयोग करून बघा.
  •  घर त्यांना त्यांच्या पद्धतीने सजवू द्या.
  • लेकरांचा आवडता खाऊ त्यांच्या मदतीने बनवत त्याची प्रक्रिया त्यांना करायला सांगा.
  • स्वयंपाक घरात विज्ञानाचीही अभ्यास होतो व त्यामुळे विविध कौशल्य वाढीस लागतात हेही सांगा.
  •  गाणी ऐकणे, नृत्य करणे, एखादा चित्रपट घरीच बसून पाहणे यातून कुटुंबाला एकत्रित वेळ घालविता येईल.
  •  रोजच्या रुटीन कामापेक्षा नवीन प्रयोग करून पाहावेत.
  •  दिवसभर मोबाईल, लॅपटॉप अशा तांत्रिक गोष्टींनाही सुट्टी द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com