जेईई मेन्सप्रमाणे ॲडव्हान्समधेही घडणार हे...वाचा सविस्तर

मंगेश गोमासे
Wednesday, 16 September 2020

देशभरात २७ सप्टेंबरला जेईई ॲडव्हान्स ची परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स पासून दूर चालल्याचे चित्र दिसून येत आहेत. गेल्यावर्षी २०१९ मध्ये जेईई मेसमध्ये पात्र ७० हजारावर विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स साठी नोंदणी केली नसल्याचे दिसून आले. हा आकडा यावर्षी आणखी वाढू शकतो. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे.

नागपूर : दोन दिवसांपूर्वी जेईई मेन्सच्या निकालाची घोषणा करण्यात आली. या परीक्षेत २ लाख २३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. आता अशीच परिस्थिती जेईई ॲडव्हान्स या परीक्षेतही निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी ‘ड्रॉप' घेत पुढल्या वर्षी परीक्षा देण्याचा ‘मुड' बनविल्याचे दिसून येत आहे.

देशभरात २७ सप्टेंबरला जेईई ॲडव्हान्स ची परीक्षा घेण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स पासून दूर चालल्याचे चित्र दिसून येत आहेत. गेल्यावर्षी २०१९ मध्ये जेईई मेसमध्ये पात्र ७० हजारावर विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स साठी नोंदणी केली नसल्याचे दिसून आले. हा आकडा यावर्षी आणखी वाढू शकतो. कोरोनामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई मेन्ससाठी 3 तर अडव्हान्स साठी 2 संधी देण्यात येतात. या संधी गमावल्यावर पुन्हा परीक्षा देता येत नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स देण्यापेक्षा मेन्सच्या आधारावरच प्रवेश घेताना दिसतात. शिवाय नॉनमॅटोसिटीमधील विद्यार्थी शहरातील एनआयटी मध्ये प्रवेश घेतात.

कोरोनामुळे संगणक इन्स्टिट्यूट झाले बंद; होतकरु विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान; प्रशिक्षणापासून वंचित

जेईई मेन्समध्ये २ लाख २३ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. याचा फायदा इतर विद्यार्थ्यांना झाला खरा, मात्र, यावर्षीचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहिला. त्यामुळे जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरवूनही बरेच विद्यार्थी परीक्षा देतील का ? हा प्रश्न आहे. देशातील २३ आयआयटीमध्ये ११ हजार २८९ जागा आहेत. यासाठी २७ सप्टेंबरला सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २.३० ते ५.३० दरम्यान परीक्षा घेण्यात येईल.

जेईई ॲडव्हान्स परीक्षेतील आकडेवारी

वर्ष - पात्र विद्यार्थी - बसलेले विद्यार्थी (लाखात)
२०१९ - २.४५ - १.७३
२०१८ - २.३१ - १.६५
२०१७ - २.२१ - १.७२
२०१६ - १.९८ - १.५६

यावर्षीचा कट ऑफ
सर्वसाधारण गट -९०.३७६५३३५ पॅसेंटाईल,
आर्थिक मागास प्रवर्ग (इडब्ल्यूएस) -७०.२४३५५१८ पॅसेंटाईल
ओबीसी -७२.८८८७९५९ पॅसेंटाईल
अनुसूचित जाती - ५०.१७६०२४५ पॅसेंटाईल
अनुसूचित जमाती - ३९. ०६९६१०१ पॅसेंटाईल
दिव्यांग विद्यार्थी - ०.०६१८५२३ पॅसेंटाईल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like JEE Mains, it will also be in advance....