मानसिक शांतीसाठी खुणावतेय कामठीचे विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’

कामठीचे विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’
कामठीचे विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’

नागपूर ग्रामीणः आजच्या काळात मनुष्य ताणतणावाखाली जगत आहे. कुठल्याही क्षेत्रात स्पर्धा आली की ताणतनाव येणे ओघाने आलेच. केवळ भारतच नव्हे तर ही परिस्थिती जगात सगळीकडे आहे. ताणतनावातून आत्महत्त्या, खून, मारामाऱ्या, एकाकीपणा व अनेक नवनवीन आजार यासारखे प्रकार समाजात उद्भवत आहेत. यावर उपाय म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला विपश्‍यपनेचा मार्ग. माणसाच्या जीवनात ‘सम्यक’ता निर्माण करणारी ही विपश्‍यना कामठीच्या ड्रॅगन पॅलेस येथे शिकविली जाते.
 
अधिक वाचाः राज्य आपत्ती पथकाचा लागला कस, तब्बल १४ तासांनी लागला मृतदेह हाती...

डॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर
डॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरच्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून सामुहिक ध्यान, साधना व धम्म देसना कार्यक्रम घेण्यात आला. माजी मंत्री तसेच ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते या परिसरात एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला. जिल्हयातील कामठी येथे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरमध्ये आतापर्यंत हजारापेक्षा अधिक लोकांनी विपश्यनेचा लाभ घेतला. कामठी येथे १० एकर जागेवर ३ वर्षापूर्वी २२ सप्टेंबर २०१७ रोजी देशावे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माजी राज्यपाल विद्यासागर राव, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अॅड.सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटरचे उद्घाटन झाले होते. ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन केंद्रात नियमित १० दिवस,  ३ दिवस व दर पोर्णिमेला एक दिवसीय शिबिराचे वर्षभर आयोजन केले जाते. जगभरातील साधकांनी शिबीरामध्ये सहभाग घेऊन धम्माचा लाभ घेतला आहे.

असे आहे विपश्यना केंद्र
विपश्यना मेडीटेशन केंद्रामध्यो दोन प्रशस्त सभागृह आहेत. सामुहीक साधना होते. ३२ शुन्यागार व्यक्तिगत साधनेकरिता उपलब्ध आहेत, तसेच ७२ व्यक्तिगत स्वतंत्र निवास खोल्या आहेत. १०० लोकांना सामुहिक राहण्याकरिता निवासाची व्यवस्था उपलब्ध आहेत. दहा एकर जागेवर बांधण्यात आलेल्या विपश्यना मेडीटेशन केंद्राला म्यानमार येथून आलेल्या ५ आकर्षक छत्र्या लावण्यात आल्या आहेत. जगभरातील बौद्ध साधकांनी विपश्यना मेडीटेशन केंद्राचे कौतुक केले आहे.  मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण विपश्यना मेडीटेशन केंद्रामध्ये प्रवेश बंद आहे.

संपादनः विजयकुमार राऊत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com