दिशाभूल करून फायनान्स केलेल्या २४ दुचाकी जप्त, तीन आरोपींना अटक

kamptee police seized 24 bikes
kamptee police seized 24 bikes

कामठी ( जि. नागपूर ) :  संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कामगार नगर कामठी रहिवासी एका तरुणाने गरजू व्यक्तींच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करणार असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडून कागदपत्रे गोळा करून त्यांची दिशाभूल केली. कागदपत्रांचा वापर त्यांच्या नावाने दुचाकी फायनान्स करण्यासाठी केला असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

या व्यक्तीच्या नावाने हे दुचाकी फायनान्स एका विख्यात फायनान्सच्या नावाखाली खुशबू मोटर्स येथून केले. मात्र, फायनान्स केलेल्या दुचाकीची मासिक किस्त वेळेवर न पोहोचल्याने किस्त बाऊन्स झाली. त्यामुळे रक्कम वसूल करण्यासाठी वसुली एजेंट घरी आला. आपण दुचाकी फायनान्स केली नसतानाही आपल्या नावावर कुणीतरी दुचाकी फायनान्स केल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या व्यक्ती ललीत बिरोले (वय३५, रनाळा कामठी) यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवीत या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून त्यांच्याकडून दिशाभूल करून फसवणुकीच्या माध्यमातून बनावट फायनान्स केलेल्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या. यानुसार १४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीमध्ये गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार जिशात खान इब्राहिम खान (वय२८), प्रसिद्ध फायनान्स कंपनीचा एजेंट मोहम्मद तन्वीर अख्तर (वय30) तसेच उमेरुद्दीन अन्सारी (वय30, कामठी) यांचा समावेश असून या प्रकरणात अजूनही गौप्यस्फोट होणार आहे.

या प्रकरणात शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लवकरच तपास लागणार असून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई डीसीपी निलोत्पल, एसीपी अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल, दुय्यम पोलिस निरीक्षक राध्येश्याम पाल, एपीआय कन्नाके, डीबी स्कॉडचे मंगेश यादव, मंगेश लांजेवार, पप्पू यादव, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, सुरेंद्र शेंडे, संदीप गुप्ता, विनायक आसटकर, मनोहर राऊत, कृष्णा दाभने, निलेश यादव, रोशन पाटील, ललित यादव, दिलीप कुमरे, वेदप्रकाश यादव, मंगेश गिरी, राहुल ठाकूर, आशीष भुरकुंडे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com