घरीच पिकवूया भाज्या, किचन गार्डन उत्तम पर्याय!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

बाहेरून आणलेल्या भाजीमार्फत घरात कोरोनाचे विषाणू येऊ शकतात अशी शक्‍यता वर्तविली जात असल्याने, गृहीणींनी घरीच आवश्‍यक भाज्या पिकविण्यास सुरूवात केली आहे.

नागपूर : आरोग्य उत्तम राखायचं असेल तर निसर्गाशी मैत्री करा, नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा, असं वारंवार सांगितलं जातं. हीच गोष्ट लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी किचन गार्डनची संकल्पना राबविली आहे. बाहेरून आणलेल्या भाजीमार्फत घरात कोरोनाचे विषाणू येऊ शकतात अशी शक्‍यता वर्तविली जात असल्याने, गृहीणींनी घरीच आवश्‍यक भाज्या पिकविण्यास सुरूवात केली आहे.
उपलब्ध साहित्यातच किचन गार्डन
घरीच किचन गार्डन कसे करावे, याविषयी अलिकडे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.
नारळाच्या शेंड्या, त्यावर किचनवेस्ट किंवा पालापाचोळा दाबून भरावा, वरून थोडी माती टाकावी. घरीच कंपोस्टींग करावे. या पद्धतीने घरीच माती विना शेती, किचन गार्डन, टेरेस गार्डन अशा संकल्पना राबविता येतील.
अशा पेरा भाज्या

  • मेथी, धने, मोहरी पेरल्यास काही दिवसातच हिरव्या भाज्या निघू लागतात.
  • शरीराला पोषक रसाची गरज आहे. संसर्गीत भाज्या फळांपेक्षा घरीच गहू पेरल्यास उगवलेल्या तृण रसाचे ज्यूस पिऊन तंदुरूस्त राहता येईल.
  • कमी दिवसात हरबरे पिक येणार नाही पण पाल्यांची भाजी नक्की होईल.
  • थोडेफार पालकांचे बिज असेल तर पेरावे किंवा बाजारातून पालकाची जूडी आणल्यास पाने काढून त्याची मुळे पेरावीत. महिनाभरात पालक तयार होईल.
  • कांदा, लसून लागवड केल्यास महिनाभरात कांद्यांची पात मिळेल.
  • गाजर, मुळा, बिट याचें खोड पुन्हा मातीत लावा. त्याच्या पानांपासून पराठे तयार करता येतात.
  • रान भाज्या कोणत्या आहेत. याचा अभ्यास करावा आपल्या बागेत येणारे तण ही रानभाजी असू शकते.

काही लोकांकडे घरच्या भाज्या जास्तीच्या येत असल्यास त्याचे निर्जलीकरण करून ठेवा. पावसाळ्यात त्याच कामास येतील.
 विकत आणलेल्या भाज्यांचे निर्जलीकरण करून ठेवा त्याचा उपयोग पावसाळ्यात होणार आहे. या वर्षी सलग पाऊस राहणार आहे.

सविस्तर वाचा - मुंढे साहेब, सातशे जणांना क्‍वारंटाईन करण्याची वेळ कोणामुळे आली आता माफी मागा...
 पुढील तीन महिन्यात भाज्या येतील याचे नियोजन करा. मिरची, टोमॅटो, वांगी, बटाटे, वेलवर्गीय ( वाल, भोपळा, गिलके, दोडके, तोंडलीचा वेल ) यांची लागवड करा.. बियाणं पेरा  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kitchen garden is a best option during corona