पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू, गत आठ दिवसांत चौथा; व्यवस्थापनावर प्रश्‍नचिन्ह

leopard Death in Gorewada Rescue Center
leopard Death in Gorewada Rescue Center

नागपूर, : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील मृत्यूचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. आज रविवारी एका बिबट्याचा यकृत व मृत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले. गेल्या आठ दिवसामधील गोरेवाड्यातील हा चवथा मृत्यू आहे. यामुळे बचाव केंद्रातील व्यवस्थापनावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. 


जुन्नर वन विभागातील ओतुर वनपरिक्षेत्रातून मानव-पशुधनावर हल्ला केल्याने 2015 मध्ये पाच बिबट्यांना बंदिस्त केले होते. ते पाचही बिबटे माणिकडोह बिबट बचाव केंद्रातून गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या पाच वर्षापासून पाचही बिबटांचे संगोपन येथे केले जात आहे. त्यातील 12 वर्षाच्या मादीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शवविच्छेदन चमूच्या प्राथमिक निरीक्षणानुसार मृत्यू यकृत व मृत्रपिंडाच्या आजाराने झाला असावा असा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर निश्‍चित कारण स्पष्ट होईल. शवविच्छेदनानंतर त्याचे दहन करण्यात आले. ही कारवाई विभागीय वनाधिकारी नंदकिशोर काळे, सहाय्यक वनसंरक्ष एच. व्ही. माडभुषी, वन परिक्षेत्र अधिकारी निलय भोगे, वनपाल राजू वलथरे, वनरक्षक एच. एम. किनकर यांच्यासमोर करण्यात आली. 

सरकारच्या चुकीच्या धोरणाचा कोळशाला फटका, ही आहेत उत्पादनबंदीची कारणे... 

एका आठवड्यात दोन वाघ आणि दोन बिबट्यांसह चार वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याने केंद्राच्या व्यवस्थापनावर प्रश्‍नचिन्ह लागले आहे. वन्यप्राणी बचाव केंद्रात सध्या नऊ वाघ, 23 बिबटे व 10 अस्वल संगोपणासाठी ठेवण्यात आलेले आहेत. यापूर्वी डिसेंबर 2018 साली एक बिबट्याचा वृध्दाकाळ व मृत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी कायमस्वरुपी मुक्कामावर असलेल्या बिबट्याच्या मादीचा मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com