मुले माकड आहेत की उंदीर? का आली पालकावर हा प्रश्‍न विचारण्याची वेळ?

Letter of parrent to education minister
Letter of parrent to education minister

नागपूर : आमच्या मुलांना शाळेत बोलावून त्यांच्यावर प्रयोग का करता? उद्या आमच्या मुलांना संसर्ग झाला, तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? असा संतप्त सवाल पालक वर्ग करू लागले आहेत. सोशल मीडियावरून या प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पालकांनी असे अनेक प्रश्‍न सररकारला विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

15 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. अनेक शाळा व्यवस्थापनानेही याबाबत चर्चा सुरू केल्या आहेत. परंतु कोरोनामुळे मुंबई, पुणे, नागपूर, अकोला आदी शहरे बेजार झाली आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण हळूहळू सापडू लागले आहे. एकूणच कोरोनाने कहर माजवला असताना, शाळा सुरू करण्याचा विचार म्हणजे महाभयंकर असून आमच्या मुलांच्या जीवनासोबत खेळण्याचाच प्रकार आहे, अशा संतप्त प्रक्रिया सोशल मीडियावरून उमटत आहे. सरकारला उद्देशून अनेक प्रश्‍नही विचारले जात आहेत..

विजय ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शाळा सुरू करण्याच्या चर्चेवर "एका पालकाने विचारलेले प्रश्‍न' या मथळ्याखाली लांबलचक प्रश्‍नांची पोस्टच टाकली आहे. खालील पैकी एका जरी प्रश्नाचे उत्तर देता आले तर नक्की शाळा सुरू करा, असे आवाहनही या पत्रात केले आहे. या पत्रात उपस्थित केलेले प्रश्‍न वाचाच...

  • 1) कोरोनावर खात्रीलायक औषध सापडले आहे का?
  • 2) लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता कमी नसते का?
  • 3) प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी बसवाल. पण सध्या एका बेंचवर तीन-तीन विद्यार्धी दाटीवाटीने बसविले जातात. त्या पटसंख्येच्या मानाने जास्त बेंच व वर्गखोल्या लागतील. त्या कशा उपलब्ध करणार?
  • 4) शाळा भरताना व सुटल्यावर होणारी गर्दी कशी टाळणार?
  • 5) मधल्या सुटीत टॉयलेटमध्ये गर्दी होते, त्याचे नियोजन काय?
  • 6) जिथे शहाणी माणसे ऐकत नाहीत, तिथे लहान मुले ऐकतील का?
  • 7) मोठ्या माणसांना त्रास झाला तर नेमके काय होते हे त्यांना सांगता येते. लहान मुले सांगू शकतील का?
  • 8) सर्व व्यवस्थित आहे, हे दाखविण्यासाठी या साठी शाळा सुरू करायच्या आहेत का?
  • 9) या तीन महिन्यांत घरी असताना नाही-नाही ते केले आणि करतही आहेत. पालकांनी ते अगदती जवळून बघितले आहे. तरी ते शाळेत पाठवतील का?
  • 10) प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शिक्षकांना शक्‍य आहे का?
  • 11) पहिले काही दिवस नियम पाळले जातील. पण नंतर दुर्लक्ष होणार नाही का?
  • 12) शाळेत संसर्ग झाला तर, शालेय संस्था जबाबदारी घेत पुढील सहकार्य करतील का हात झटकुन जबाबदारी टाळतील?
  • 13) मुलांवर प्रयोग करण्यापेक्षा. लोकसभा व विधानसभा चालू करुन कोरोना संसर्ग वाढतो की नाही, हे पाहणे जास्त योग्य वाटत नाही का?
  • 14) स्कुल बस, रिक्षावाले मुलांची ने-आण करताना नियम पाळतील का?
  • 15) उद्या शाळेत एखाद्या विद्यार्थ्यांला संसर्ग झाला, तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना क्वॉरंटाइन करावे लागेल. शिक्षकांनाही करावे लागेल. त्याची तयारी आहे का?
  • 16) क्वॉरंटाइनकरीता आपल्या मुलाला किंवा मुलीला एकटे सोडण्याची कुठल्या पालकांची तयारी होईल?
  • 17) बहुतेक पालकांना अलीकडे एक किंवा 2 अपत्ये आहेत, जर त्यांच्या मुलांना काही बरे वाईट झाले, तर ते कोणाच्या आधारे जगतील?
  • 18) शिक्षण महत्त्वाचे की जीवन? एक वर्ष मुलाने कमी अभ्यास केला किंवा नाही केला तर, असे किती नुकसान होणार आहे?
  • 19) प्रयोग करुन पहायला मुले काय माकडे किंवा उंदीर आहेत का?

यापैकी कोणाचे उत्तर हो म्हणून आहे? याबाबत विचार अवश्‍य करा, असे आवाहनही पालकाने केले आहे. एकूणच काय तर मुलांसी शाळा सुरू होणार या चर्चेवरून पालक चिंतित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com