दुवा देणारे हात देऊ लागले दवा

Linking hands began to give medicine
Linking hands began to give medicine

केवल जीवनतारे 
 नागपूर : कोण काय म्हणतं, याकडे दुर्लक्ष करत खऱ्याची पारख करीत सरळ वाटेनं निघणारा चिकाटीच्या बळावर ध्येयाचा पाठलाग करतो. यांनीही असाच ध्येयाचा पाठलाग केला. प्रसंगी ताजाबागेतील मशिदीत चादर चढवण्यासाठी आलेल्या भक्तांकडून चादर स्वीकारण्यासह या परिसराची स्वच्छता करण्यापासून तर प्रसाद वाटण्यापर्यंतची कामे केली. लहानपणापासून ताजबागेत चादर चढवण्यासाठी मदत करणारे ‘दुवा देणारे हात भविष्यात दवा’ देण्यासाठी पुढे आले. गळ्यात स्टेथस्कोप आला. 

नागपूरच्या सुपरमध्ये विशेष कार्य अधिकारी पदापासून तर यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये अधिष्ठातापद यशस्वी भूषविल्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) वैद्यकीय अधीक्षकपदाची भूमिका निभावताना रुग्ण आणि डॉक्टर या दोघांमधे बंध कसे जुळतील, वैद्यकीय यंत्रणेचा सुलभ लाभ गरिबांना कसा लवकर मिळेल हाच ध्यास घेतलेले डॉक्टर अशी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची जनमानसांत ओळख बनली आहे. 

डॉ. श्रीगिरीवार यांनी आईने केलेला संघर्ष बघितला. यामुळे आई हीच प्रेरणास्थान बनली. डॉक्टर बनण्याची प्रेरणा आईनेच दिली. बारावीत चांगले टक्के मिळवले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमबीबीएसला नंबर लागला. पुढे न्यायवैद्यकशास्त्र विभागात एमडी केले. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रा. चंद्रशेखर डाऊ यांचा मोठा प्रभाव मनावर आहे. अयोध्यानगरात राहात असताना संत ताजुद्दीन बाबांच्या दर्शनास ते येत होते. 

अनुभवांची शिदोरी… 

मेयो रुग्णालयातील न्याय सहायक विभागात कार्यरत असताना सकाळ वृत्तपत्रात ‘उंदीर शव कुरतडतात’ या आशयाची बातमी प्रकाशित झाली. एका संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली. शासनाने या बातमीची दखल घेतली. राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाँतील शवविच्छेदनगृहाच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला. यासाठी तत्कालीन शासनाने समिती गठित केली. समितीमध्ये न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप दीक्षित, तज्ज्ञ डॉ. मनीष श्रीगिरीवार आणि मुंबईच्या नायर हॉस्पिटलचे डॉ. शैलेश मोहिते यांचा समावेश केला. देशभरात समितीने निरीक्षण दौरा केला. गोव्यातील बांबोलिम मेडिकल कॉलेजमधील शवविच्छेदनगृह योग्य असल्याचा अहवाल न्यायालयाला सादर केला. या शिफारशीची राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये अंमलबजावणी सुरू झाली. तर सुपर स्पेशालिटीत गरिबांना योग्य उपचार मिळावे यासाठी विविध उपाययोजना केल्या, अशा शेकडो अनुभवांची शिदोरी घेऊन मदत करण्याचे कर्म करीत आहे. 

सध्या एम्समध्ये आमच्या संचालिका मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. डॉक्टर झाल्यानंतर गरजवंतांना मदत करणे हेच आपले कर्म राहिले आहे. गरिबांशी नेमकं कोणत्या भावनेतून व्यक्त व्हावं याची शिकवण आणि अनुभव प्रत्येकाकडूनच घेत आहे. 
-डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com