एका खोलीत ठेवतात पाच रुग्ण, काय आहे नागपूरच्या क्वारंटाईन सेंटरचे वास्तव?

corona patient
corona patient

नागपूर : आमदार निवासात रुग्णांचा मुक्तसंचार सुरू आहे. सर्व रुग्ण एकमेकांना सहज भेटतात. एकत्रित जवेणही करीत असल्याने करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत असल्याचे बाबा बगदादिया बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व युवा नेता साहील सैय्यद यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पॉझेटिव्ह रुग्णाला वैद्यकीय महाविद्यालयात हलविल्यानंतर त्याची खोली निर्जंतुक केली जात नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. 

करोना संशयितांसाठी आमदार निवासात विलगिकरणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. येथे संशियातास 14 दिवस ठेवले जाते. यात पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णाला मेडिकल, मेयो येथे उपचारासाठी हलविले जाते. त्यानंतर नव्या संशियाताला तेथे ठेवले जाते. तत्पूर्वी संबंधित खोली सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महसूल विभागामार्फत सॅनिटाईज करणे आवश्‍यक असते. मात्र तसे केले जात नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

येथील एका खोलीत चार ते पाच रुग्णांना ठेवण्यात आले आहे. याचासुद्धा धोका आहे. त्यामुळे येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्‍टर व इतर कर्मचारी तणाव आणि भीतीत आहेत. आमदार निवासात मोकाट कुत्र्यांचाही सुळसुळाट आहे. सर्वच मजल्यांवर ते फिरत असतात. 

येथे चोवीस तास सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांच्या आरामासाठीसुद्धा चांगली व्यवस्था नाही. त्यांना कुलरही उपलब्ध करून देण्यात आले नाही. सध्या शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. सरासरी 43 ते 44 डिग्री तापमानात सेवा देताना डॉक्‍टरांनासुद्धा त्रास होत आहे. या सर्व गंभीर बाबी साहील सय्यद यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा सय्यद यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com