esakal | लम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नेण्याआणण्यास प्रतिबंध घालण्यात आले. कोणत्याही गोजातीय प्रजातीय प्राण्याचे बाजार भरवणे, प्राण्याची शर्यत लावणे, प्राण्याची जत्रा भरवणे, प्राण्याचे प्रदर्शन भरविण्यावर प्रतिबंध घालण्यात आला.

लम्पी आजारामुळे जनावरांसाठी लॉकडाउन

sakal_logo
By
नीलेश डोये


नागपूर, ता.२८ : करोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाला सुमारे एक महिना लॉकडाऊन करण्यात आले होते, त्याप्रमाणे जनावरांना लम्पी आजाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जनावरांची वाहतूक, प्रदर्शनावर बंदी आली आहे.

कोरोनाची विषाणू संसर्गजन्य आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना हा आजार होतो. याचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. देशात ५० लाखांवर लोकांना याची लागण झाली असून हजारो लोकांचा मृत्यू झाला. कोरोना प्रमाणे लम्पी आजार आहे. हा आजार जनावरांना होतो. एकापासून दुसऱ्याला होतो. या आजाराचा संम्पर्कही वाढत आहे. नागपूर जिल्ह्यात १६ हजारांवर जनावरांना याची लागण झाली आहे.

अजब शासन गजब निर्णय! खरेदी - विक्रीवर दोन तर हक्क सोडण्यासाठी चार टक्के मुद्रांक शुल्क

राज्यात हा आकडा लाखाच्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर आळा घालण्यासाठी लसीकरण करण्यात येत आहे. बाधित जनावरांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्यात. तसेच आता त्यांच्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरला कृषी, पशुसंर्वधन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी आदेश काढलेत. यानुसार औरंगाबाद, अकोला, अमरावती, अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, बीड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, नागपूर, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे सांगण्यात येते. या क्षेत्रात जनावरांच्या नेण्याआणण्यास प्रतिबंध घालण्यात आले.

कोणत्याही गोजातीय प्रजातीय प्राण्याचे बाजार भरवणे, प्राण्याची शर्यत लावणे, प्राण्याची जत्रा भरवणे, प्राण्याचे प्रदर्शन भरविण्यावर प्रतिबंध घालण्यात आला. बाधित जिवंत जनावर किंवा प्राणी यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही प्रकारचे वैरण, निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा साहित्य, त्यांचे शव, कातडी तसेच त्यांच्या पासून तयार होणारी उत्पादने इतर क्षेत्रात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.