घरी कोणीही नसल्याचे पाहून तो आला दहा मिनिट अंगणात चर्चा केली आणि...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

ती 16 वर्षांची आणि तो 22 वर्षांचा. ती कॉलेजला अकरावीचे शिक्षण घेते तर तो इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानावर कामाला जातो. एकाच वस्तीत राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कुणालाही न जुमानता त्यांनी हा निर्णय घेतला...

नागपूर : अल्पवयीन मुलगी 22 वर्षीय मुलाच्या प्रेमात आकंठ बुडाली. यातून तिने शिक्षणाकडे लक्ष देणे सोडले. ती कॉलेजला न जाता प्रियकरासोबत बाहेर फिरायला जात होती. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी विरोध केला. मात्र, एक दिवस घरी कुणीही कुणीही नसल्याची संधी साधून प्रियकराने प्रेयसीसोबत पलायन केले. हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येताच नंदनवन पोलिसात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. नंदनवन पोलिसांनी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - नागपुरात घडले "छपाक', "लेबॉरेटरी असिस्टंट'ने...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन परिसरात 16 वर्षीय मुलगी डॉली (बदललेले नाव) राहते. ती सध्या अकरावीत शिक्षण घेत आहे. वस्तीत राहणारा विक्‍की जहाजपुरे (वय 22) याच्यासोबत तिची ओळख झाली. विक्‍की हा तिच्या आईवडिलांचाही परिचित होता. त्यामुळे त्याचे नेहमी घरी येणे-जाणे होते. यादरम्यान, विक्‍की आणि डॉलीचे सूत जुळले व भेटी वाढल्या. डॉली ही विक्‍कीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे ती कॉलेज सोडून अनेकदा विक्‍कीसोबत फिरायला जात होती.

संबंधित इमेज

विक्‍की हा इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानावर कामाला होता. तोसुद्धा काम बुडवून डॉलीसोबत फिरत होता. मंगळवारी डॉलीचे आईवडील बाहेर गेले होते. तर सात वर्षांचा भाऊ घरी होता. सकाळी 10.45 वाजता विक्‍की डॉलीच्या घरी आला. दोघांनीही दहा मिनिटे अंगणात चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही सोबतच पळ काढला. सायंकाळी तिचे आईवडील घरी आले. मुलगी अचानक घरून बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

उघडून तर बघा - व्हेरी हॉरर..! जंगलात आढळले मुंडके नसलेले महिलेचे विवस्त्र धड

मुलगी घरात कुठेही दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र ती सापडली नाही. यानंतर विक्कीने तिला पळवून नेल्याची माहिती लहान मुलाने सांगितली. त्यामुळे आईवडिलांनी नंदनवन पोलिसात तक्रार केली. पीएसआय रवी बारड यांनी तक्रार नोंदवून घेत विक्‍कीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

यापूर्वी दोनदा पलायन!

विक्‍की आणि डॉली एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडाले आहेत. मात्र, डॉली केवळ 17 वर्षांची असल्यामुळे तिने शिक्षणाकडे लक्ष द्यावे, अशी तिच्या आईवडिलांची इच्छा आहे. तसेच विक्‍कीशी संबंध ठेवण्यास त्यांचा विरोधसुद्धा आहे. घरातील विरोध पाहता यापूर्वी डॉली आणि विक्‍कीने दोनदा घरातून पलायन केले आहे. मात्र, काही नातेवाइकांच्या सल्ल्याने आतापर्यंत पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, विक्‍की ऐकत नसल्यामुळे डॉलीच्या आईवडिलांनी थेट पोलिसात अपहरण केल्याची तक्रार केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lovers Couple Escape in Nagpur