राज्य शासनाचा नागपूर महापालिकेला धक्का, महापौरांच्या अध्यक्षतेतील समिती रद्द

maharashtra government cancel committee under mayor presidency in nagpur municipal corporation
maharashtra government cancel committee under mayor presidency in nagpur municipal corporation

नागपूर : सहायक आयुक्त, वार्ड अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मनपा सभेने महापौरांच्या अध्यक्षतेत समिती गठित केली होती. परंतु, महापालिका सभेचा हा मंजूर ठराव राज्य सरकारने विखंडीत केला. एकप्रकारे राज्य सरकारने सत्ताधाऱ्यांना चाप लावल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेतील समिती रद्द केल्याने आता महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक आयुक्त, वार्ड अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

सरळ सेवा भरतीने महापालिकेच्या आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त, वार्ड अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. नियुक्तीसाठी १७ जानेवारी २०१८ रोजी जाहिरात दिली होती. १८ उमेदवारांची ६ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘महाऑनलाईन’द्वारे लेखी परीक्षा घेण्यात आली. गुणानुक्रमानुसार ५ उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता ८ फेब्रुवारी २०१९ रोजी बोलाविण्यात आले होते. मुलाखतीत घनश्याम पंधरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर तर योगेश गेडाम यांचे नाव द्वितीय क्रमांकावर आहे. योगेश गेडाम यांना प्रतीक्षा यादीत ठेवून घनश्याम पंधरे यांना नियुक्ती देण्यात आली. हे पद वर्ग १ चे असल्याने २० जून २०१९ रोजी हा विषय महानगरपालिकेच्या महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी नगरसेवकांनी महापौरांच्या अध्यक्षतेत ५ सदस्यांची समिती गठित करून समितीमार्फत मुलाखती घेण्याची सूचना केली. अशा पद्धतीने सभागृहाने सदस्यांच्या सूचनेसह विषय मंजूर केला. 

घनश्याम पंधरे यांची मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार त्यांची निवड केली असताना महापौरांच्या अध्यक्षतेत समिती गठित करून पुन्हा मुलाखती घेणे महापालिका अधिनियमातील तरतुदीच्या विसंगत आहे. त्यामुळे हा ठराव विखंडित करावा, असे पत्र मनपा आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविले होता. त्यानुसार नगरविकास विभागाने ३० डिसेंबर २०२० रोजी हा ठराव तात्पुरता विखंडित केला होता. एक महिन्याच्या आत स्पष्टीकरण देण्याचे आदेश मनपा आयुक्तांना शासनाने दिले होते. परंतु, यासंदर्भात कुठलेच पत्र मनपाकडून मिळाले नाही. त्यामुळे महापौरांच्या अध्यक्षतेतील मुलाखत समितीच रद्द करून २० जानेवारी २०२० चा ठराव विखंडित करण्यात येत असल्याचे पत्र ७ एप्रिलला राज्य शासनाने महानगरपालिकेला पाठविले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com