कोरोना काळाचा असाही सदुपयोग,  या विभागाने लावला मेंटनन्सच्या कामांचा धडाका

Maintenance of 189 railway track in 1978 hours
Maintenance of 189 railway track in 1978 hours

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने देशभरातील नियमित रेल्वेगाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे मिळणाऱ्या फावल्या वेळेचा सदुपयोग करीत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीवर भर दिला आहे. नागपूर विभागाने जुलैमध्ये १ हजार ९७८ तासांत १८९ किमी ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण केले.

मोजक्याच प्रवासी गाड्यांसह पार्सल व मालगाड्या तेवढ्याच धावत आहेत. जुलै महिन्यात परिचालन विभागाने गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत अभियांत्रिकी विभागाला ट्रॅकच्या देखरेखीसाठी १ हजार ९७८ तासांचा अवधी उपलब्ध करून दिला. या वेळेत १८८.३१ किलोमीटरच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली. या कामासाठी वेगवेगळ्य अत्याधुनिक यंत्रांची मदत घेण्यात आली. ८० नंबर टर्नआऊट टैपिंग यूनिमल -४ एस मशीनद्वारे दुरुस्तीचे कामे करण्यात आले. 

तसेच बीआरएम मशीनद्वारे २६.४७ किमीपर्यंत गिट्टीचा भराव करण्यात आला. ७३.११ किमी मार्गाचे स्थिरीकरणाचे काम डीजीएस मशीनद्वारे करण्यात आले. याशिवाय गोंदिया स्थानकावर असलेल्या एफओबीचा विस्तार, गोंदिया गूड्सशेडध्येमध्ये अतिरिक्त सुविधा, ब्रह्मपुरीमध्ये नवीन एफओबीची कामे करण्यात आली. त्याशिवाय चाचेर व बिनेकी स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंगची कामेही पूर्ण करण्यात आली.

धोकादायी तुडके हटवून जागा मोकळी

ट्रॅकलगत असणारे स्लीपरचे जवळपास ४ हजार ५०७ धोकादायी तुडके हटवून जागा मोकळी करण्यात आली. शिवाय १३.२६ किलोमीटर रेल्वे ट्रॅकच्या नवीनीकरणाचे कामे करण्यात आले. रेल्वे रुळावर २३ हजार ३० घनमीटर गिट्टी ट्रकखाली टाकण्यात आली. त्याचबरोबर ट्रॅकला ४७२ ठिकाणी एटी वेल्डिंग करण्यात आले. 

 ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम 

४३९.२१ किमी रेल्वेमार्गाचे परीक्षण, मोठ्या भागात वेल्ड परीक्षण, ४७.५ किमी टर्नआऊट परीक्षण, २८.८७ किमी एसईजे परीक्षण यूएसएफडीद्वारे करण्यात आले. नैनपुर-चिरईडोंगरी दरम्यान ९० ते १०० किमी प्रतितास एवढी गती वाढविण्यासाठी ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. ११ रेल्वे फाटकांचे ओवरहॉलिंग करण्यात आले. 

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com