खंडणीबाज मंगेश कडवचा आणखी एक कारनामा उघड; तीन लाखात हडपती सात एकर जमीन

mangesh kadav
mangesh kadav

नागपूर :  शिवसेना पक्षातून हकालपट्‌टी करण्यात आलेला शहरप्रमुख खंडणीबाज मंगेश कडव याच्याभोवती गुन्हे शाखेने फास आवळला आहे. कडवने केवळ तीन लाख रुपयांत सात एक शेती हडपल्याची तक्रार मुंबईतून गुन्हे शाखेला प्राप्त झाली आहे. कडवला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असून तो 17 जुलैपर्यंत गुन्हेशाखा पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करीत असून, पोलिसांनी त्याच्या तीन डझन लाभार्थ्यांना नोटीस बजावली आहे. त्यापैकी चार लाभार्थ्यांची सोमवारी गुन्हेशाखा पोलिसांनी कसून चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथील एका व्यक्तीला मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती. याबाबत कडव याला कळले. त्याने त्या व्यक्तीशी संपर्क साधला. शेतीचे दस्तऐवज गहाण ठेऊन कडव याने त्या व्यक्तीला तीन लाख रुपये दिले. त्यानंतर बनावट दस्तऐवज तयार करून शेती विकली. या व्यक्तीने त्याला शेतीचे दस्तऐवज मागितले. त्याने दस्तऐवज परत केले नाही. ठार मारण्याची धमकी दिली. नागपूर पोलिसांनी कडव याला अटक केल्याची माहिती मिळताच या व्यक्तीने ईमेलद्वारे कडव याच्याविरुद्ध पोलिसांना तक्रार पाठवली. या वृत्ताला गुन्हेशाखेच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. कडव त्याच्याविरुद्ध सोमवारी आणखी तीन तक्रार आल्या.
वाचा- संधी मिळताच मेडिकलमधून पळाले दोन कोरोना रुग्ण अन्‌ उडाला गोंधळ, वाचा काय झाले ते...

 त्याच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीची संख्या आता दहा झाली आहे. दरम्यान, गुन्हेशाखा पोलिसांनी कडव याच्या भरतनगरमधील घराची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, करारनामे, भूखंडाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. कडव याने सौंदर्यप्रसाधनाच्या चार फर्ममध्ये गुंतवणूक केल्याचेही दस्तऐवजाच्या तपासणीत आढळून आले. यासोबतच त्याने शिवसेना पक्ष फंडाच्या नावावर सुपारी व्यवसायिकाकडून दरमहा वसूल करण्यात येत असलेल्या 50 लाखांची विल्हेवाट भाऊ आणि डॉक्‍टर पत्नी रुचिका हिच्या नातेवाइकाकडे केली असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com