आता सहज, वेदनामुक्त पद्धतीने काढता येणार गर्भ; गर्भवतींच्या सुरक्षित प्रसूतीसाठी उपकरणाची निर्मिती

योगेश बरवड | Sunday, 20 September 2020

उपकरणाची परिणामकारिता सिद्ध झाल्यानंतर पेटेंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान संस्थेने संयुक्तरीत्या त्यांना साहाय्य केले.

नागपूर : बाळाचा जन्म हा घरातील प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असला, तरी त्याच्या वेदना आईलाच सोसाव्या लागतात. ऐन बाळांतपणाच्या वेळी शारीरिक गुंतागुंत निर्माण झाल्यास वेदना अधिकच वाढतात. आशा स्थितीत डॉक्टरांकडून सिजेरिनचा सल्ला दिला जातो. प्रसूतिवेदना कमी करण्यासह सुरक्षित प्रसूतीसाठी सहायक ठरणाऱ्या उपकरणाची निर्मिती अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळून केली आहे.

सिजेरिन अधिक वेदनादायी ठरते. या वेदना कमी व्हाव्यात यासाठी वानाडोंगरी येथील यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी कुशाग्रकुमार नंदकिशोर वंजारी आणि काजल रवींद्र रॉय हे प्रयत्नशील होते.

हेही वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन

अंतिम वर्षात याच प्रकल्पाची निवड करून प्रयत्न सुरू केले. महत्प्रयत्नानंतर उपकरण तयार करण्यात यश आले. त्याच्या मदतीने नैसर्गिक प्रसूती अधिक सुकर होईलच. गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही शस्त्रक्रिया टाळणे शक्य होऊ शकणार आहे. याशिवाय कोणत्याही कारणाने ३ ते ६ महिन्यांचा गर्भ काढायचा झाल्यास हे कार्यही सहज आणि वेदनामुक्त पद्धतीने करता येऊ शकेल.

उपकरणाची परिणामकारिता सिद्ध झाल्यानंतर पेटेंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय विज्ञान संस्थेने संयुक्तरीत्या त्यांना साहाय्य केले.

जाणून घ्या - मुंबई-पुण्याला जायचं, नो टेन्शन!, उद्यापासून ही लांब पल्ल्याची  सेवा होणार सुरू

यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप खेडकर यांचे तांत्रिक मार्गदर्शन तर सावंगीच्या ओबीजीवाय जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक डॉ. अर्पिता जयस्वाल-सिंघम यांचे वैद्यकीय मार्गदर्शन त्यांना लाभले. डॉ. पुनीत फुलझेले प्रकल्प समन्वयक आहेत.

प्रसूतीसाठीची शस्‍त्रक्रियाही टाळली जाऊ शकते

प्रसूतिवेदना कमी करण्यासह सुरक्षित प्रसूतीसाठी सहायक ठरणाऱ्या उपकरणाची निर्मिती अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळून केली आहे. या यंत्राच्या मदतीने अनेक प्रकरणांमध्ये प्रसूतीसाठीची शस्‍त्रक्रियाही टाळली जाऊ शकते, हे विशेष. वैद्यकीय कसोट्यांवर उपकरणाची उपयोगिता तपासली जात असून पेटेंट मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वाचा - ते लांब बसून रडत होते; काही नागरिक बघून निघून गेले, पडाटे आले सत्य समोर

उपकरणाची कार्यपद्धती

  • कॅथेटर ग्रीवामध्ये घातला जातो. 
  • सलाइन कॅथेटरमधून जाते आणि ग्रीवाच्या आत कॅथेटरला अँकर करण्यासाठी बलून फुगवते. 
  • प्रक्षेपण रॉड मार्गदर्शक ट्यूबमधून सुरक्षा आणि सावधगिरीने आत जाते. 
  • मार्गदर्शक ट्यूबमध्ये प्रसार रॉड टाकल्यानंतर फांद्या हळूहळू उघडण्यास सुरुवात होते. 
  • प्रक्षेपण रॉड फ्लॅक्सला बाहेरून ढकलतो आणि विघटन प्रक्रिया सुरू होते. 
  • हळूहळू प्रसार रॉड बाहेर काढून फ्लॅप्स त्यांच्या मूळ स्थितीत आणले जातात. 
  • गर्भाशय ग्रीवाच्या बाहेर हळूहळू जागा तयार करून फुगलेला बलून बाहेर काढला जातो.

क्लिक करा - सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या

उत्पादकांचा शोध 
उपकरणाची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. अधिक प्रमाणात उत्पादन घेतले गेल्यास उपकरणाची किंमतही कमी होऊ शकते. यामुळे उपकरण निर्मितीच्या दृष्टीने उत्पादकांचा शोध घेतला जात असल्याचे संशोधक कुशलाग्रकुमार वंजारी याने सांगितले.

 संपादन - नीलेश डाखोरे