विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

many years ago men also wear rings in leg read full story
many years ago men also wear rings in leg read full story

नागपूर: भारतीय परंपरेत लग्नसमारंभ आणि विधींना अनन्यसाधारण महत्व आहे. लग्नाच्या वेळी निरनिराळ्या प्रकारचे विधी पार पाडले जातात. लग्नात वर वधूला मंगळसूत्र, जोडवे आणि इतर आभूषणे घालतो. यात जोडव्यांचे विशेष महत्व आहे. स्त्रियांनी जोडवे घालणे हे हिंदू संस्कृतीत पवित्र मानल्या गेले आहे. मात्र जोडवे घालण्याचे काही फायदेही आहेत. 

आजकालच्या काळात अनेक स्त्रियांना जोडवे घालायला आवडत नाहीत. तर काही स्त्रियांच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना जोडवे घालणे शक्य होत नाही. मात्र बहुतांश स्त्रिया आवडीने जोडवे घालतात. अनेक स्त्रिया निरनिराळ्या फॅशनचे जोडवे घालतात ज्यामुळे त्यांच्या पायांची शोभा अधिक वाढते. पण  आधीच्या काळात पुरुषही जोडवे घालायचे हे तुम्हाला माहिती आहे का? तसेच  महिला जोडवे का घालतात ? त्याचे फायदे काय ? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. आज आम्ही तुम्हला याच प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. 

जोडवे का घालतात? 

स्त्रियांनी जोडवे घालणे पवित्र मानले जाते. तसेच जोडवे घालणे हे सौभाग्याचे लक्षण आहे. एकप्रकारे जोडवे घालणे म्हणजे स्त्रीचे लग्न झाल्याची खुण आहे म्हणून महिला जोडवे घालतात. साधारणतः जोडवे हे चांदीचे असतात. अनेक स्त्रिया पायच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटातही जोडवे घालतात. 

जोडवे घालण्याचे फायंदे 

  • पायात जोडवे घातल्यामुळे आपल्या शरीरातील एकेमकांशी जोडल्या गेलेल्या अवयवांचा समतोल उत्तमपणे साधल्या जातो.  हे एक प्रकारचे ऍक्युप्रेशर आहे.
     
  • जोडवे घालण्याचा संबंध मासिक पाळीशी असतो. जर स्त्रीने दोन्ही पायात जोडवे घातले तर मासिक पाळी नियमित येण्यात मदत होते.
     
  • चांदीचे जोडवे घातल्यामुळे शरीरात उत्साह राहतो. चांदीमधून ऊर्जेचा प्रवाह उत्तम होतो. त्यामुळे जोडव्यामुळे ही ऊर्जा शरीराला मिळून उत्साह निर्माण करते.
     
  • जोडवे नियमित दोन्ही पायांच्या बोटात घातल्यामुळे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता चांगली राहते. म्हणूनच अनेक स्त्रियांना लग्न झाल्यावर जोडवे घालण्याची सक्ती केली जाते.

पुरुषसुद्धा घालत होते जोडवे 

शरीरात पौरुषत्व टिकवून ठेवण्यासाठी आधीच्या काळात पुरुषसुद्धा जोडवे घालत होते. समागमाच्या वेळी जोडवे नेहमी महत्वाची भूमिका बजावतात. स्त्रियांच्या पायात जोडवे दिसल्यावर समागमाच्या वेळी पुरुष खूप उत्तेजित होत असतात. म्हणून स्त्रिया पायात जोडवे घालतात. 


सौजन्य: Tinystep blog 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com