बुद्ध तत्वज्ञानाचा पाईक असलेल्या जपानमधील शहरे बॉम्बस्फोटांनी हादरली तेव्हा... भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाईंनी दिला उजाळा

surai final.
surai final.

नागपूर : ६ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा तर ९ ऑगस्टला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. मानवी इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून संपूर्ण जगाला स्तब्ध केले. या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, लाखो लोक मृत्युमुखी पडले. मृतांचा अक्षरश: खच पडला होता. विज्ञानाने मानवावर केलेला तो मोठा हल्ला होता. त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई.

आजही त्या दिवसाची आठवण सांगताना ऐकणाèयाच्या अंगावरही शहारे येतात. आणि सांगताना भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या चेहèयावरील सुरकुत्याही बोलत्या झाल्या अन् प्रत्यक्षात त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हाचे दृश्य उभे झाले. ससाईंच्या आवाजात थराराची कंपने जाणवत होती.

मानवी शरीर केवळ हाडांचा सांगाडा झाला होता. चिंधड्या-चिंधड्या झालेल्या शरीराचे तुकडे शहरात विखुरले होते. काहींच्या शरीराचे धड, डोळे आणि शरीराचे भाग लोंबकळत होते. माणूस माणसाला पाहण्याची हिंमत करू शकत नव्हता, आपला जीव मुठीत घेऊन लोक मिळेल त्या दिशेने पळत होते. मृतांचा खच... भुकेची तीव्रता अन् सर्वत्र आक्रोश होता. अशी भयावह स्थिती एका अणुबॉम्बने केली होती.

बुद्धाच्या शांती आणि करुणेच्या मार्गाने चालणारे भदंत ससाई जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी हल्ल्याच्या आठवणी सांगताना म्हणाले, मी त्यावेळी १२ -१३ वर्षाचा असेन. हिरोशिमापासून जवळपास ४०० ते ५०० कि. मी. अंतरावर निमी शहर आहे. शहरापासून काही अंतरावरच शुंगो नावाचे गाव आहे. डोंगराच्या (पहाड) मधोमध असलेल्या या गावी त्यांचा जन्म झाला.

जपानच्या सुवर्ण इतिहासात शुंगो या गावाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यावरही शुंगो गावात तीव्रता नव्हती. त्या दुर्दैवी घटनेच्या वेळी इयत्ता सातव्या वर्गात शिकत असल्याचे ससाई सांगतात, घरापासून ४ ते ५ कि.मी. अंतरावर शाळा होती. पायीच ये-जा करायचे. या घटनेनंतर नागरिकांत प्रचंड संताप होता. विद्याथ्र्यांनी शाळेच्या परिसरात अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाचा पुतळा तयार केला. सर्व विद्यार्थी येता-जाता त्या पुतळ्याला मारायचे, टोचायचे आणि आपला रोष व्यक्त करायचे. असा क्रम अनेक दिवस चालला.

ससार्इंचे वडील त्या काळी बांधकाम व्यवसायात होते. त्यामुळे आर्थिक स्थिती भक्कमच. ही घटना शहरात झाल्याने गावात फारशी चाहुल नव्हती. मात्र, आपला जीव मुठीत घेऊन मोठ्या प्रमाणात लोक ग्रामीण भागाकडे वळले. क्योतो आणि ओसाका येथून ससार्इंच्या घरीही वडिलांकडील नातेवाईक आले. ससाई शाळेतून घरी परतल्यावर मोठ्या प्रमाणात मंडळी पाहुन तेही थबकले. वडिलांनी त्यांच्यासाठी तात्पुरते निवासस्थान बांधून दिले. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय केली. जवळपास वर्ष त्यांनी काढले. हिरोशिमा-नागासाकीदिनाच्या निमित्ताने हे भयावह वास्तव सांगताना तो दुर्दैवी दिवस आठवला की, धम्मसेना नायक सुरेई ससाई यांच्या मनाला प्रचंड वेदना होतात. डोळ्यांत अश्रू गर्दी करतात.


महायुद्धात दोन्ही मामा शहीद
ससार्इंच्या आईला दोन भाऊ. दोघेही लष्कारात होते. दुसèया महायुद्धात दोन्ही मामा शहीद झाल्याचे ससाई आवर्जून सांगतात. या घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी जपान सरकारने ओकिनावा द्वीपामध्ये रुग्णालय उभारले. त्या रुग्णालयात अनेकांनी उपचार घेतले. ससाई (१९ वर्षांचे झाल्यावर) रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस करीत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आज जगात जशी स्थिती आहे, त्यापेक्षाही कितीतरी पटीने भयंकर अशी नागरिकांची स्थिती होती.

रेडिओद्वारे मिळाली माहिती
जपानचे तत्कालिन राष्ट्रध्यक्ष राष्ट्राला संबोधित करणार होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी घराघरात लोक जमले. ससाई एका घरी गेले. त्या घरात शेजारी आणि रस्त्याने जाणारेही थांबले. सर्वांचे कान रेडिओकडे लागले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे स्पष्ट काही ऐकायला येत नव्हते. परंतु, हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आल्याचे साèयांनाच कळून चुकले होते.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com