बेलगाम तरुणाईला त्यांच्याच भाषेत समज देण्यासाठी रॅप; ‘नीट चालव गाडी नाहीतर फाईन मारू भाऊ’

Message of traffic rules from rap by Nagpur police
Message of traffic rules from rap by Nagpur police

नागपूर : बेलगाम तरुणाईला त्यांच्याच भाषेत समज देण्यासाठी आरटीओ विभागाचे प्रशांत चिंचोळकर यांच्या पुढाकारातून नागपूरकर हर्षद सालपेने रॅप साँग तयार केले आहे. सध्या ‘नीट चालव गाडी नाहीतर फाईन मारू भाऊ’ हे रॅप सॉंग चर्चेत आले आहे.

नागपूर जिल्ह्याचा विचार केल्यास जानेवारी ते सप्टेंबर-२०२०मध्ये तब्बल १५५ नागरिक अपघातांचे बळी ठरले. दरवर्षी देशभरात रस्ते सुरक्षा अभियान राबवून अपघातमुक्ती व वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यात येते. यंदाही १७ फेब्रुवारीपर्यंत ३२ वे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक प्रशांत चिंचोळकर जनजागृतीसाठी दरवेळी नवनवीन संकल्पनांचा ध्यास धरतात. त्यांच्या पुढाकारातून प्रयास, अर्धस्वप्न, काऊंटडाऊन हे जनजागृतीपर लघुपट तयार करण्यात आले आहेत.

काऊंटडाऊन या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन नागपूरकर हर्षद सालपे यानेच केले होते. सध्या वर्धा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असणारे प्रशांत चिंचोळकर यांनी युवकांच्या भाषेतच युवकांना वाहतूक नियमांचे धडे देण्याचा आग्रह धरला. सध्या सर्वाधिक ट्रेंडिंमध्ये असल्याने रॅप तयार करण्याचा विडा हर्षदने उचलला आणि अल्पावधीत तो पूर्णही केला.

रॅपमधून ट्रिपल सीट, विना हेल्मेट वाहन चालविणारे, वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कटाक्ष टाकण्यासोबतच वाहतूक पोलिस आणि आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तत्परताही अधोरेखित करण्यात आली आहे. संकल्पना प्रशांत चिंचोळकर यांची असून गायक स्नायपर ४७, संगीत संयोजन ओमकार वैद्य याचे तर अभिषेक चिंचोळकर यांनी हे गीत अस्तित्वात आणले आहे. 

जागृतीपर रॅप
तरुणांना रुचेल-पचेल असे माध्यम म्हणून जागृतीपर रॅप तयार केले आहे. युवकांना वाहतूक नियमांच्या पालनाचा संदेश देणाऱ्या या रॅपची नीट चालव गाडी नाहीतर फाईन मारू भाऊ ही हूक लाइनही अनेकाजण गुणगुणू लागले याचा आनंद आहे. 
- हर्षद सालपे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com