esakal | जि. प. अध्यक्षा म्हणतात, विरोधकांकडून दिशाभूल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

विरोधी पक्षनेत्यांच्या सर्कलमध्ये ४० लाख दिल्याचा दावा त्यांनी करीत कामठी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे सांगितले. फक्त प्रसिद्धीसाठी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत असल्याची टीका केली.

जि. प. अध्यक्षा म्हणतात, विरोधकांकडून दिशाभूल

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : विरोधी पक्षनेते अनिल निधान यांनी दलित वस्तीचा निधी अध्यक्षा व सभापतींनी अधिकचा लाटल्याचा आरोप केला होता. अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी विरोधकांच्या आरोपाला प्रतिउत्तर देत कामठीतही मोठ्याप्रमाणात निधी दिल्याचे सांगत त्यांच्याकडून दिशाभूल होत असल्याचा हल्ला चढवला.


अध्यक्षा रश्मी बर्वे म्हणाल्या की, दलित वस्तीचा निधी आराखड्यानूसार वितरित केला जातो. त्यात बदल करण्याचा अधिकार कुणालाही नसतो. त्यानुसारच निधी वाटप होतो. किमान याचा अभ्यास तरी विरोधी पक्षनेत्याला असणे आवश्यक आहे. सहा महिन्यांपूर्वीची यादी विरोधी पक्षनेते दाखवित असून नवीन यादी अद्यापही जाहीर झालेली नाही.

बीडीओंनी चक्‍क तीन शिक्षकांनाच विस्तार अधिकारी म्हणून दिला अतिरिक्त प्रभार; मुख्यालय अनभिज्ञ

त्यांनीच यादी केव्हा प्रकाशित झाली ते सांगावे. सध्या २०१९-२० या आर्थिक वर्षाच्याच निधीचे वाटप निकषानुसार झाल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेत्यांच्या सर्कलमध्ये ४० लाख दिल्याचा दावा त्यांनी करीत कामठी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे सांगितले. फक्त प्रसिद्धीसाठी सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत असल्याची टीका केली.

त्यांच्या काळात अधिकच्या दराने खरेदी
शिक्षण विभागात साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. परंतु, सर्व प्रक्रिया त्यांची सत्ता असल्याच्या काळातील असून त्यांनी गत वर्षी खरेदी केलेल्या दरापेक्षा आम्ही कमी दरात केली. शासनाने निश्चित केलेल्या जेम पोर्टलवरून केली. खरेदी प्रक्रिया त्यांनी केली. आम्ही त्यावर अमल केला. या खरेदी गैरव्यवहार झाला असेल तर मागील वेळीच्या खरेदीतही गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी करावे, असे त्या म्हणाले.

शिक्षकांच्या बदल्या पारदर्शी
शिक्षकांच्या बदल्या २०१९ साली झाल्या असत्या तर कोणताही विरोध झाला नसता. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन आणि इनकॅमेरा झाल्या. या बदल्या पारदर्शीपणे झाल्या. विरोधकांकडे कोणतेही विषय नसल्याने फक्त आरोप करीत असल्याचा टोला बर्वे यांनी लगावला. 

go to top