जनधन योजनेचा महिलांना थोडासा आधार; खात्यात जमा झाले पैसे

rupees
rupees

नागपूर : पंतप्रधान जनधन योजनेत बॅंकेत बचत खाते उघडलेल्या महिलांच्या खात्यावर पुढील तीन महिने प्रति महिला पाचशे रुपये रक्कम जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेल्या लॉकडाउनच्या काळात ही रक्कम कुटुंबांसाठी आधार ठरणार आहे.
योजनेअंतर्गत ही रक्कम सदर महिला खातेदारांना दिली जाणार असून एप्रिल महिन्याची रक्कम दिनांक 2 एप्रिल रोजी संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात आली आहे. ही रक्कम बँकांनी तत्काळ जनधन खाते असणाऱ्या महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यास प्रारंभ केला असून रक्कम जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर धडकले आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू साथीमुळे बँकेच्या शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर जनधन खाते असणाऱ्या महिलांची गर्दी होऊ नये म्हणून केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने ही रक्कम खात्यावरून काढण्यासाठी वेळापत्रक आखून दिले आहे. यानुसार दिनांक 3 एप्रिल रोजी ज्या खाते क्रमांकाचा शेवट 1 ने होतो, अशा खातेदारांनी ही रक्कम काढली. 4 एप्रिल रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 2 किंवा 3 ने होतो अशा खात्यावरील रक्कम काढता आली. 5 एप्रिल रोजी रविवार आणि 6 एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुटी असल्याने व्यवहार बंद होते. तर 7 एप्रिल रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट 4 किंवा 5 या अंकांनी होतो अशा खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढता आली 8 एप्रिल रोजी ज्या खाते क्रमांकाचा शेवट 6 किंवा 7 ने होतो, तर 9 एप्रिल रोजी ज्या खाते क्रमांकाच्या शेवटी 8 किंवा 9 हे अंक आहेत अशा खातेदारांना त्यांच्या खात्यातील रक्कम काढता येणार आहे.

सलग तीन महिने मिळणार निधी
ज्या महिलांना वरील वेळापत्रकानुसार पैसे काढायला जमणार नाही अशा महिला 9 एप्रिलनंतर कधीही त्यांच्या खात्यातून प्रधानमंत्री गरीब योजनेच्या अनुदानाचे पैसे काढू शकतील अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत सरकारने दिलेल्या या थोड्या पैशांचाही महिलांना मोठा आधार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com