मिस्टर परफेक्‍शनिस्टच्या चित्रपटात दिसले असते "स्लम सॉकर' 

केवल जीवनतारे
मंगळवार, 7 जानेवारी 2020

झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या "स्लम सॉकर'वर आधारित "झुंड' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तब्बल 45 दिवस चित्रपटसृष्टीतील शहेनशहा अमिताभ बच्चन आणि "सैराट'कार नागराज मंजुळे या चित्रपटाच्या निमित्ताने नागपुरात एकत्र आले होते. 

नागपूर : अमिताभ बच्चन यांच्या झुंडच्या चित्रीकरणाच्या वर्ष-दीड वर्षापूर्वी मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार होते, अशी माहिती आता पुढे आली आहे. 

आमिर खान यांच्या "सत्यमेव जयते' कार्यक्रमाच्या निमित्ताने हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. विजय बारसे यांच्याशी झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिल्याचा इतिहास पुढे येताच, त्यांनी या कथेवर चित्रपट तयार करण्याचा संकल्प सोडला. "स्लम सॉकर'चे प्रणेते अशी त्यांची ओळख तयार झाली. 

चित्रपटाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष 

वाईट मार्गाला लागलेल्या तरुणांना प्रा. विजय बारसे यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणल्याची माहिती आमिर खान यांच्या मनात घर करून गेली. त्यानंतर आमिर आणि बारसे यांची भेट झाली. चित्रपट तयार करण्याची दिशा ठरली. कागदावर रेखाटने तयार झाले. मात्र, यातील फुटबालपटूंशी आमिर खान यांची चर्चा झाली. तब्बल सहा महिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवणाऱ्या झोपडपट्टीतील फुटबालपटूंशी चर्चा झाली. मात्र, अर्थकारणावरून काहीतरी बिनसले आणि आमिर खान यांनी या चित्रपटाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष केले. 

No photo description available.

"झुंड'ने बाळसे धरले 

यानंतर "सैराट'कार नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे "झुंड' असे बाळसे करण्यात आले. चित्रपट पूर्ण झाला असून, फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

असे का घडले? : ती कॉलेजला जात होती आणि झाला घात...

परशा-आर्ची दिसणार 

नागराज मंजुळे यांचा "झुंड' पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. नवीन मुलगा अंकुश गेडाम "झुंड'मधून झळकणार आहे. "सैराट' चित्रपटातील "परशा' अन्‌ "आर्ची'सह याच चित्रपटात "परशा'च्या बापाची भूमिका साकारणारे संभाजी तांगडे बिग "बी'सोबत दिसतील. नागपुरातील चित्रीकरणापूर्वी गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी आल्या होत्या.

सविस्तर वाचा : घरात सुरू होती लग्नाची तयारी आणि 'तो' बोहल्यावर चढण्यापूर्वीच...

चित्रीकरण थांबवावे लागले

शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट उभारण्यात आला होता. परंतु, काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावे लागले. त्यानंतर अमिताभ बच्चन चित्रपटापासून दूर जात असल्याची चर्चा होती. शेवटी बिग बीनं "झुंड'चं शूटिंग नागपूरमध्ये केले आणि ते सुरळीत पार पडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr. Perfectionist's movie would have appeared in "Slum Soccer"