शिवीगाळ केल्यावरून कुख्यात आरोपीला संपविले 

murder of a Hooligan from an old dispute one accused arrested
murder of a Hooligan from an old dispute one accused arrested

नागपूर  ः कुख्यात गुंड अनिल पालकर हत्याकांडात मुख्य आरोपीला अटक केली तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. संतोष इतलाल शाहू (गोपालनगर, तिसरा बस स्टॉप) असे अटकेतील तर चंदन नायर (५५, रा. प्रतापनगर) अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष शाहू आणि त्याचा भाऊ अमित शाहू यांनी अनिलच्या मालकीचे दुकान किरायाने घेतले आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूलाच आरोपी चंदन नायरचे बेकरीचे दुकान आहे. संतोष आणि नायर यांच्यासोबत अनिल याचा किरायाच्या कारणावरून अनेकदा वाद झाला आहे. 

संतोष आणि चंदन यांच्या दुकानाच्या समोर एक महिला नारळ पाणी विक्री करते. सोमवारी रात्री साडेआठ वाजता अनिल दुकानासमोर आला आणि नारळ विक्री करणाऱ्या महिलेच्या दुकानासमोर लघुशंका करीत होता. त्यामुळे ती महिला त्याच्यावर ओरडली. अनिलने त्या महिलेला शिवीगाळ केली. 

त्यांचा वाद सोडविण्यासाठी चंदन आणि संतोष दोघेही मध्यस्थी करीत होते. मात्र अनिलने दोघांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे संतोषने शिवीगाळ न करण्याबाबत विनंती केली. अनिल दोघांनाही मारायला धावला. त्यामुळे संतोष आणि चंदनने चाकूने सपासप वार करीत अनिलच जागीच मुडदा पाडला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संतोष शाहू याला अटक केली. तर चंदन नायर फरार आहे.

कोण आहे अनिल

अनिल पालकर कुख्यात गुंड असून, त्याने हिंगणा परिसरात एक हत्याकांड घडवून आणले होते. हत्याकांडानंतर त्याने हिंगणा परिसर सोडून गोपालनगरात घर बांधले होते. हिंगणातील महाजनवाडी वानाडोंगरीत त्याचे पालकर सभागृह आहे. हिंगण्यात त्याचे सराफा दुकान होते. सध्या ते बंद आहे. हिंगण्यातील धनगरपुऱ्यात अनिलने नवीन कोट्यवधींचे लॉन उभारण्याचे काम सुरू केले होते. त्याची परिसरात दहशत होती. दारू प्यायल्यानंतर तो कुणालाही मारहाण करीत होता, अशी माहिती आहे.

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com